उटीत येथील विवाहितेची हत्या प्रकरणी पती सह सासू-सासरेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी,!
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम उटी गावात अल्पवधीतच लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद हत्या करून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत मुलगी लक्ष्मी पवन धुंदाळे हिची आई श्रीमती देवकन्या ज्योतीराम परघरमोर (रा. आडसुळ, ता. शेगाव) यांनी पती, सासरे आणि सासू यांच्यावर संगनमत करून निर्घृण हत्या केल्याची गंभीर तक्रार जळगाव जामोद पोलिसात दाखल केली आहे.
Vol,,लक्ष्मीचा विवाह दि. २ जून २०२४ रोजी आडसुळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मात्र विवाहानंतर तिचा पती पवन गजानन धुंदाळे, सासरे गजानन महादेव धुंदाळे व सासू पुष्पा गजानन धुंदाळे यांनी तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे पीडित आईने तक्रारीत म्हटले आहे की, पती-सासू-सासऱ्यांनी घरातील खर्च आणि शेतीसाठी वारंवार पैशांची मागणी केली होती मागणी नुसार एकदा ५० हजार रुपये घेतले, तरीही मुलीचा छळ थांबला नाही. “तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये” असा दबाव मुलीवर ठेवत अमानुष अत्याचार करण्यात आला अत्याचाराचा शेवट मुलीच्या जीवावर आला. तीनही संशयितांनी संगनमत करून तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून मनुष्यवध केल्याचा आरोप केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात सर्व आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार आईने पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी न झाल्यास ती आपल्या कुटुंबासह बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही तिने तक्रारीत दिला आहे.
या तक्रारीची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. घटनेने उटी परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले असून पुढील पोलिस तपास सुरू आहे,
अहिल्या न्युज24 चॅनल करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी
0 Comments