*जळगाव जामोद बस आगार परिसरात अंधार,बस वेळेवर लागत नाहीत.. आगार व्यवस्थापक पवन टाले यांचा नियोजनशून्य कारभार...*
जळगाव जामोद दि.९
जळगाव जामोद आगाराचे परिसरातील मागील काही महिन्यापासून पथदिवे बंद असुन रात्रीच्या वेळी प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना बस आगारात करावा लागतो.अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आपला डाव साधू शकतात,तसेच बस स्थानकावर अंधारामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर आहे. या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन अनेक मजनू संधीचा फायदा घेऊन महिलांना त्रास देऊ शकतात. तसेच या बस स्थानकावर सुरक्षारक्षकही तैनात नाही त्यामुळे बस स्थानकाच्या सुरक्षिता प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी असंख्य एसटी बसेस गावांच्या फलकाविना धावतात यामुळे प्रवाशांना एसटी कुठे जाते हे समजत नाही.आगाराच्या परिसरातील कित्येक सीसीटीव्ही कॅमेरे बंदोबस्त आहेत.तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जळगाव जामोद आगारातील या गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन तोडगा काढावा. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना जळगाव जामोद आगारात घडेल.. तसेच सुलभ शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. शौचालयातील नळांना पाणीही नाही.
हात धुण्यासाठी येथील बेसिन नादुरुस्त आहेत. चौकशी कक्षामध्ये एसटी बस कुठे जात आहे याची लाऊड स्पीकर द्वारे अनाउन्समेंट होत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडते, तसेच आगारातील गाड्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर व दर्जेदार होत नसल्यामुळे येथील बसेस नेहमी बंद पडत असल्यामुळे सेवेचा दर्जा खालावला आहे.वेळेवर बस धावत नसल्याने लांब पल्ल्याच्या च्या गाड्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होते तर सुनगांव, जामोद, आसलगाव, खांडवी जाणाऱ्या एसटी बस खाली धावत असुन आगार व्यवस्थापक पवन टाले यांच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसुन जळगाव जामोद आगार तोट्यात चालत आहे.आगारातील कित्येक वाहक प्रवाश्यांना गैरवर्तणूक देत असल्याचे सुध्दा प्रवासी वर्ग बोलत आहे.त्यामुळे आगारातील या समस्यांवर वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.
0 Comments