बाईचे डोहाळे जेवण आपणा सर्वांना माहिती आहे.मात्र जळगाव खान्देश येथे महाबळ कॉलनीमध्ये राहणारे नोकरी साठी वास्तव्य करीत असलेले कुटुंब गाई वरील प्रेम व संस्कारीक पद्धत जोपासणारे कुटुंब नोकरी करून घरी गाईचे पालन पोषण करीत आहे..
त्यांचे हे हिंदू धर्माचे संस्कार गाईला देवता मानणारे कुटुंब एकमेव प्रेरणास्थान म्हणून समजते.
बरेचसे आई-वडिलांना सोडून बायकोचे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात साजरे करणारे भरपूर कुटुंबे आहेत..
मात्र या कुटुंबाने गाईचे सातव्या महिन्याचे डोहाळे जेवण म्हणून 250 ते 300 व्यक्तींना बफे जेवण तसेच 21 सुवासिनी च्या हस्ते गायीची ओटी भरून पूजा केली. व तिला पोट भरून फळे, धान्य, हिरवे पालेभाज्या, हिरवा चारा यांचा नैवेद्य दिला..
रात्री बऱ्याच वेळापर्यंत भजनांचा सुद्धा कार्यक्रम त्यांनी साजरा केला..
अशा कुटुंबापासून गाईचे रक्षण व संस्काराचे शिक्षण हे या कार्यक्रमातून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घेण्यासारखा आगळावेगळा "" गाईचे डोहाळे जेवण "" समजून कार्यक्रम साजरा केला..!
गजानन बी. कवळे
जिल्हा प्रतिनिधी जळगाव ( खा.)
0 Comments