Advertisement

अकोट अकोला मेमूच्या वेळा पूर्वीच्याच कायम ठेवाव्या नाहीतर आंदोलन करावे लागेल" ॲड. नंदकिशोर शेळके मनसे राज्य सरचिटणीस....

"अकोट अकोला मेमूच्या वेळा पूर्वीच्याच कायम ठेवाव्या नाहीतर आंदोलन करावे लागेल"
      ॲड. नंदकिशोर शेळके मनसे राज्य सरचिटणीस....
     अकोट अकोला मेमु पॅसेंजर गाडी  वेळेत बदल केल्यामुळे अकोट रेल्वे प्रवाशी वर्गाची जनरल मॅनेजर दक्षिण मध्य रेल्वे आणि डी. आर. एम. नांदेड विभाग यांना निवेदनआज रेल्वे स्टेशन मास्तर, फ्लॅट नो.६  अकोला वर ३५२ रेल्वे प्रवाशांच्या सह्यानिशी दिनांक १७/१२/२०२५ रोजी देण्यात आले... त्यावेळेस मनसे विधी विभाग राज्य सरचिटणीस यांनी निवेदनात म्हटले की अकोला अकोट मेमू रेल्वे पॅसेंजर नोव्हेंबर २०२२ लां सुरु झाली तेंव्हा पासुन अकोट व परिसरातील सरकारी कर्मचारी वर्ग, दररोज शिक्षणाकरिता अकोला येथे येणारा विद्यार्थी वर्ग, तसेच ईतर खाजगी नौकर वर्ग, बँकेतील कर्मचारी, तसेच इतर वर्गा तीलरेल्वे प्रवाशी वर्ग हजारोंचे संख्येने नियमीत येनेजा ने करतात,


 अचानक रेल्वे जनरल मॅनजर, डी. आर. एम. दक्षिण मध्य रेल्वे नांदेड यांनी  अकोट अकोला मे मु रेल्वे च्या वेळेत बदल केल्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशी विद्यार्थी ईतर नियमित प्रवाशी गोंधळले त्यांनी सर्व माहिती मनसे चेविधी विभागाचे राज्य सरचिटणीस तसेच ॲड नंदकिशोर शेळके यांना सांगितली त्यानंतर सर्व रेल्वे प्रवासी संघटना अकोट व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रवासी यांचे विनंती वरून आज ॲड नंदकिशोर शेळके यांच्या नेतृत्वात शेकडो रेल्वे प्रवासी यांचे सहीने निवेदन डी.आर.एम.दक्षिण मध्य रेल्वे नांदेड करिता स्टेशन मास्तर अकोला यांना दिले आहेत....

Post a Comment

0 Comments