Advertisement

विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय, सुनगाव येथे शैक्षणिक उपक्रमांच्या अंतर्गत प्रश्नमंजुषा व एक मिनिट भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

आज दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय, सुनगाव येथे शैक्षणिक उपक्रमांच्या अंतर्गत प्रश्नमंजुषा व एक मिनिट भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील सामान्य ज्ञान, वक्तृत्वकला व आत्मविश्वास वाढवणे हा होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना घोटेकर मॅडम व तेजस बोंबटकार सर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. एस. एफ. सोळंके सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे परीक्षण अतुल डिके सर, शुभम कुलट सर व अतुल पाटील सर यांनी केले.

या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षकवृंद वैशाली राजपूत मॅडम, सचिन इंगळे सर, दुर्गादास फोलाने सर, उमेश पाटील सर, एकनाथ अढाव सर दीपावली गवई मॅडम, प्रियंका दामधर मॅडम  तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुवर्णसिंग राजपूत, रामेश्वर कुनगाडे व विशाल वसूलकार उपस्थित होते.

प्रश्नमंजुषा व एक मिनिट भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आत्मविश्वासाने भाषणे सादर केली तसेच प्रश्नमंजुषेमध्ये अचूक व जलद उत्तरे देत आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन विनया संतोष कपले व वेदिका अनिल वंडाळे यांनी केले. त्यांनी अध्यक्ष, मान्यवर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

अशा प्रकारे प्रश्नमंजुषा व एक मिनिट भाषण स्पर्धा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments