*ग्रामपंचायत जामोद चे लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई दामधर यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांना पत्र*
*निर्माणाधीन राज्य महामार्गा (SH47) वर जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव व जामोद येथे गावाची वस्ती असलेल्या भागात रस्ता-दुभाजक (Road Divider) व महामार्गा च्या दोन्ही बाजूला पक्की नाली बांधकाम करण्याची मागणी.*
जामोद चे लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई दामधर यांनी दिनांक २९ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे.
सदर पत्रात नमूद आहे की, Maharashtra Road Improvement Project (MRIP) अंतर्गत रावेर –पातोंडी-पिंपरी-नांदूर-MSH5 – डोलारखेड-कुऱ्हा—वडोदा-खांडवी-जळगाव जामोद – टूनकी – अकोट – दर्यापूर –मोर्शी वरुड या निर्माणाधीन राज्य महामार्गा (SH47) चे काम चालू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अभियंता व ठेकेदार यांच्याशी चर्चा केली असता सदर रस्त्यावर जामोद व सुनगाव येथे रस्ता दुभाजक (Road Divider ) नसल्या बाबत माहिती मिळाली.
जामोद व सुनगाव हि दोन्ही मोठी गावं असून सदर गावांची लोकसंख्या १५,००० पेक्षा अधिक आहे. जामोद व सुनगाव येथे राज्य महामार्गा (SH47) च्या दोन्ही बाजूला गावाची वस्ती आहे. सदर राज्य महामार्गा (SH47) वरून जामोद व सुनगाव गावांमध्ये जाणारे १५ पेक्षा अधिक उप रस्ते आहेत. सदर राज्य महामार्गा (SH47) वर जामोद व सुनगाव येथे शाळा, मंदिरे व बस थांबे आहेत. यामुळे स्थानिक लोकांची व शालेय विद्यार्थांची मोठी वर्दळ सदर भागात आहे. राज्य महामार्गावर दुभाजक नसल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
तसेच जामोद व सुनगाव येथे वस्ती असलेल्या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूला पक्की नाली असणे आवश्यक आहे, अन्यथा वस्ती जवळ पाणी साचून नागरीकांची गैरसोय होऊ शकते व वस्ती मधील नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहचू शकते.
तरी Maharashtra Road Improvement Project (MRIP) अंतर्गत रावेर –पातोंडी-पिंपरी-नांदूर-MSH5 – डोलारखेड-कुऱ्हा—वडोदा-खांडवी-जळगाव जामोद – टूनकी – अकोट – दर्यापूर –मोर्शी वरुड या निर्माणाधीन राज्य महामार्गा (SH47) वर जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव व जामोद येथे गावाची वस्ती असलेल्या भागात रस्ता-दुभाजक (Road Divider) व महामार्गा च्या दोन्ही बाजूला पक्की नाली बांधकाम करावे.
जो पर्यंत निर्माणाधीन राज्य महामार्गा (SH47) वर जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव व जामोद येथे गावाची वस्ती असलेल्या भागात रस्ता-दुभाजक (Road Divider) व महामार्गा च्या दोन्ही बाजूला पक्की नाली बांधकाम चा निर्णय होत नाही तोपर्यंत जामोद व सुनगाव वस्ती परिसरातील रस्त्याचे काम करण्यात येऊ नये.
अन्यथा झालेल्या अपघातास व परिणामास शासन व प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील.
0 Comments