जळगाव जामोद:
सातपुडा शिक्षण संस्थेचे सुपरीचीत व्यक्तिमत्व असलेले कर्मचारी समाधान जगदेवराव बगाडे यांचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व निरोप समारंभ सोहळा दिनांक 31 डिसेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री कृष्णराव इंगळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब इंगळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे गौरवस्थानी श्री समाधान बगाडे व त्यांच्या पत्नी सौ मनीषा ताई बगाडे उपस्थित होत्या .तसेच कार्यक्रमाच्या वेळी पीक संरक्षण विषयाचे तज्ञ श्री अनिल गाभने श्री समाधान बगाडे यांच्या सोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला व त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सदर संस्थेसाठी मागील तीस वर्षापासून प्रेरणादायक आहे असे मनोगत व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख विकास जाधव यांनी यांनी श्री समाधान बगाडे यांच्यासोबत कार्यालयीन कामकाजाचा अनुभव व्यक्त केला.
आणि या कार्यक्रमात भाऊसाहेब इंगळे यांनी सामाजिक कार्याबद्दल असे अनेक अनुभव सांगितले आणि संस्था बद्दल सुद्धा अनुभव सांगितले. तसेच सत्कारमूर्ती समाधान जगदेव बगाडे यांनी त्यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
संजय उमाळे विषय विशेषज्ञ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सदर कार्यक्रमास* कृषी विज्ञान केंद्र चे सर्व शास्त्रज्ञ व अधिकारी सपत्नीक उपस्थित होते.
0 Comments