खामगाव स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे "मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ मे " हे ध्येय घेऊन ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळ चे अन्न नाही अशा समाजातील उपेक्षिता प्रती आपले पण काही देने लागते हा उद्देश समोर ठेवून
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गरीबांना नेहमी मदत करणारे मुन्ना भाऊ शर्मा यांनी सन २००० मध्ये ह. भ. प.गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळाची स्थापना केली भजनाच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज पर्यंत मंडळाच्या माध्यमातून निस्वार्थ अखंडपणे अनेक उपक्रम सुरू आहेत शहरात गेल्या काही दिवसापासून वाढती थंडी पासून नागरिक त्रस्त झाले आहेत अश्या जीव घेण्या थंडीत खामगाव शहरात अनेक निराधार व्यक्ती उघड्यावर जगण्यास मजबुर आहेत दिवस कसाबसा काढणाऱ्या या निराधारांसाठी थंडीची रात्र काढणे अत्यंत कठीण झाले आहे नियतीने उघड्यावर आणलेल्या अंध. अपंग. आणि वृध्द निराधारांना रेल्वे स्टेशन. बस स्थानक. तसेच मंदिराचा आधार घ्यावा लागत आहे माणुसकी गोठल्या सारख्या समाजात आज ही काही ठिकाणी वृध्द आई वडिलांना घराबाहेर काढले जाते तसेच काम करण्यास असमर्थ असलेल्या अंध. अपंग व्यक्तींना ही वाऱ्यावर सोडले जाते कुटुंबाकडून
झिडकारलेल्या अशा निराधारांना उघड्यावर भीक मागून जीवन जगावे लागते खामगाव शहरात व परीसरात अनेक निराधारांचे वास्तव्य असुन ते थंडी. ऊन. पावसात कसाबसा जीवन संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसुन येत आहे नियतीने असे जीवन त्यांच्या वाट्याला आले असून नरकयातना सहन करत ते दिवस काढत आहे २८ डिसेंबर २०२५ रविवार रोजी रात्री शहरातील रेल्वे स्टेशन. बस स्थानक. शनिमंदिर. संकटमोचन हनुमान मंदिर .सामान्य रूग्णालय व परीसरातील लोकांना तेथे जावुन ब्लँकेट वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी न. प उपाध्यक्ष दर्शन सिंग ठाकूर.जेष्ठ समाज सेवक नरेंद्र मावळे. गणेश जाधव. नगरसेविका रेखा जाधव.समाजसेवक महेन्द्र पाठक. सुभाष शेळके. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. अरूण कडवकर. दिलीप झापर्डे. लालाजी सांगळे,प्रमोद सुरंगे. गंगाधर पवार.पवन पाठक.सागर ठाकूर. दादा ठाकूर.स्वराज सुकाळे. विनोद देशमुख.अभय जोध. गोपाल लाड.विक्की देशमुख. विनोद ढवळे.ज्ञानेश्वर सुकाळे.यश वानखडे.पन्नालाल
श्रीवास्तव सुशिला आवलकर.
संगिता वाघोळे. जयश्री झापर्डे.जया सुकाळे. शोभा ठाकूर.माया लांडगे.लता फंड.चैताली फंड.बबिता लांडगे.कविता केळोदे जानु शर्मा.किर्ती शर्मा. अंबिका काटकर.व मंडळाचे सर्व सदस्य व परीसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते मंडळाच्या वतीने वृक्षारोपण.रक्तदान.गोरगरीबांना भोजन वाटप. पक्ष्यांच्या करीता पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्ष भर राबविल्या जातात त्या निमित्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांना अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली
0 Comments