Advertisement

जामोद च्या लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई दामधर यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र

*जामोद च्या लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई दामधर यांचे  जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र*
*जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे सर्पदंश रुग्णांकरिता विशेष विभाग व आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देणे बाबत व प्राथमिक आरोग्य केंद्र जामोद व उप-केंद्र सुनगाव येथे सर्पदंश करिता उपचार सुविधा उपलब्ध करून देणे बाबत पत्रा द्वारे मागणी.*


सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी जामोद ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई दामधर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सर्पदंश बाबत ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्र जामोद व आरोग्य उपकेंद्र सुनगाव येथे सुविधा उपलब्ध करून देण्या बाबत पत्रा द्वारे मागणी केली आहे.
सदर पत्रात नमूद आहे की, जळगाव जामोद तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आदिवासी बहुल तालुका असून नागरिकांचा शेती व शेतमजुरी हाच मुख्य व्यवसाय आहे. सातपुडा डोंगरी भाग मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी साप आढळून येत असतात. शेती मध्ये कामगिरी करत असतांना सर्पदंश चे प्रकार नियमित घडत असतात. मागील काही वर्षात सर्पदंश मुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


            सर्पदंश चे रुग्ण शेता मधून प्रथम स्थानिक गावात येत असतात तेथे उपचार उपलब्ध नसल्याने ते ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पोहचतात व ग्रामीण रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना खामगाव करिता रेफर केल्या जाते. या प्रक्रियेमध्ये दोन ते तीन तासांचा वेल जातो परिणामी सर्पदंशाच्या रुग्णाला जीवाला मुकावे लागते. 
मागील आठवड्यात सूनगाव येथील मनोहर मारोती वंडाळे व प्रल्हाद दामधर या शेतकऱ्यांना सर्पदंश झाला असता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुनगाव येथे उपचार सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांनी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद गाठले परंतु जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथून खामगाव येथे रेफर करण्यात आले. यामधील ३८ वर्षीय मनोहर मारोती वंडाळे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
             जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे सर्पदंश रुग्णांकरिता विशेष विभाग व आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असत्या तर हे सर्पदंशाने होणारे मृत्यू टळले असते.
             तरी मी सविनय विनंती करते की, प्राथमिक आरोग्य केंद्र जामोद व उप-केंद्र सुनगाव येथे सर्पदंश करिता उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी व जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे सर्पदंश रुग्णांकरिता विशेष विभाग व आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

Post a Comment

0 Comments