चंद्रभान झिने देऊळगाव राजा
खडकपूर्णा धरणातील पाणी पाटांद्वारे तातडीने सोडण्यात यावे यासाठी सिंदखेडराजा मतदार संघाचे माजी आमदार शिवसेना नेते शशिकांत खेडेकर यांनी खंडकपूर्णा कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की,पटाद्वारे पाणी तातडीने सोडण्यात यावे अशी शेतकरी बांधवांची सतत मागणी आहे.
पाटाद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केलेली असून, पाणी न मिळाल्यास त्यांच्या पिकांचे व आर्थिक हिताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी पाटांद्वारे पाणी त्वरित सोडण्याची कार्यवाही करण्यात यावी. .
तसेच कोणत्या पाटाद्वारे, कोणत्या भागात, किती दिवस पाणी सोडण्यात येणार आहे याचे वेळापत्रक त्वरित निर्गमित करून त्याची एक प्रत उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी खेडेकर यांनी केली आहे.
0 Comments