Advertisement

आज दिनांक 21 जानेवारी 2026 ला जी. प. मराठी शाळा सुनगाव येथील वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी सातपुडा संस्थेच्या आवारात आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीला भेट दिली.

आज दिनांक 21 जानेवारी 2026 ला जी. प. मराठी शाळा सुनगाव येथील वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी सातपुडा संस्थेच्या आवारात आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीला भेट दिली.

        सदर कृषी प्रदर्शनात शेतीकरिता उपयुक्त विविध साधने,खते,बियाणे,औषधी वनस्पती व त्यापासून तयार केलेली उत्पादने ,आधुनिक अवजारे इ.चे स्टॉल लावण्यात आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कृषी प्रदर्शनात फिरून विविध साधनसाहित्यांची माहिती मिळवली.
       कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे लाइव्ह पिक प्रात्यक्षिके.यामध्ये भारतीय, महाराष्ट्र आणि विदेशी पिकांचे प्लॉट तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 
1. चिया seeds
2. ब्रोकोली हिरवी कोबी 
3. लाल मुळा 
4. लाल कोबी
5. बीट
6. कारले 
7. करडई
8. भगर 
9. वालाच्या शेंगा
10. वाटाणा
11. मधुमका 
12. मका,गहू ज्वारी, हरभरा , मटर, टरबूज , खरबूज सोयाबीन,मिर्ची यांचे विविध संकरित वाण
13. पिवळी काकडी
14. किनोव्हा
15. पिवळी झुकिनी
विद्यार्थ्यांनी वरील सर्व पिकांची पाहणी केली.तेथे उपस्थित व्हॅलेंटियर्स नी सर्व पिकांची अतिशय सुंदर अशी माहिती दिली .
        पिक पेरणी ची आधुनिक पद्धत समजून घेतली.कमी पाण्यात चांगले उत्पादन कसे मिळवता येते याची माहिती समजून घेतली.
        सरते शेवटी कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माजी आमदार कृष्णरावजी इंगळे , डॉ. संदीपजी वाकेकर यांची भेट घेऊन  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
         सातपुडा संस्थेचा आकर्षक परिसर पाहून सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटला 

Post a Comment

0 Comments