ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करा.. ... प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील,
खामगाव ः - जिल्हा परिषदेमध्ये मागील 4 वर्षापासुन प्रशासक राज सुरु आहे. प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे मनमानी कारभार सुरु असुन सर्व सामान्य जनतेची कामे रखडलेली आहे, आता 9 वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होवु घातल्या आहे. जिल्हा परिषद,पंचायत समितीची निवडणुक ही ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वपुर्ण निवडणुक मानली जाते. जर आपल्याला आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांन आपले आशिर्वाद रुपी मते देवुन विजयी करावे असे आवाहन अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी केले. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ग्राम लांजुड येथे दि.18 जानेवारी 2026 रोजी सुटाळा-वाडी जि.प.सर्कलचा भव्य सर्कल मेळावा पार पडला.त्यावेळी बोलतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा तर प्रमुख उपस्थिती म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गिरीधर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,माहुरगढ येथील दिगांबर महाराज, खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलाससिंग इंगळे,पिंप्री देशमुखचे सरपंच शेषराव गोरे,कदमापूरचे माजी सरपंच पवन पवार, शेगाव तालुका प्रमुख विजय काटोले,लांजुडचे माजी सरपंच दशरथ थेरोकार,अनंता धामोडे पाटील,राजेश धामनकार, राजु थेरोकार,रामदास थेरोकार,वासुदेवराव कानकिरड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना तुकाराम अंभोरे पाटील म्हणाले की,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची पायाभरणी केली. तोच वारसा पुढे नेत सामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जाते.अजितदादा पवार हे प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे आणि विकासाप्रती दुरदृष्टी ठेवणारे नेते आहे. सोबतच बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री पद सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असुन पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना जी मदत दिली त्यापैकी सर्वात जास्त 288 कोटी रुपयांचा मदत निधी हा बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे. मकरंद आबा पाटील यांच्ोकडुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खामगाव मतदार संघातील विविध विकासकामांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री मकरंद आबा पाटील हे नेहमीच राणा दिलीपकुमार सानंदा पाठबळ देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सानंदा यांच्या माध्यमातून खामगाव मतदार संघाचा विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये जे-जे उमेदवार दिले जातील त्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील यांनी आपल्या भाषणातुन सांगितले की, राणा दिलीपकुमार सानंदा हे आमदार असतांना त्यांनी खामगाव मतदार संघाचा चौफेर विकास केला.जात-पात-धर्म-पंथ बाजुला ठेवुन सर्वसामान्य,गोरगरीब जनतेसाठी काम करणारा नेता म्हणुन सानंदाची आजही सर्वत्र ओळख आहे.म्हणुन अश्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना आपण समर्थ साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज,राजश्री शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने घरा-घरापर्यंत जावुन पक्षाची विचारधारा आणि सरकारने केलेली कामे पोहचवावीत. जिल्हा परिषद,पंचायत समितीची निवडणुक विकासाच्या मुद्यावर लढवुन आपल्याला बुलढाणा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचा झेंडा फडकावायचा आहे असा निर्धार सानंदांनी या मेळाव्यामध्ये केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, लोकनेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा हे मागील 40 वर्षापासुन लोकसेवेचे व्रत हाती घेवुन जात-पात बाजुला ठेवुन सर्व जाती धर्मातील लोकांसाठी कामे करतात.जो पक्ष,जे नेतृत्व शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची,माता भगिणींची आणि तरुण वर्गाची काळजी घेत असेल असा पक्ष आणि अश्या नेत्याच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी जात-धर्म बाजुला ठेवुन विकासासाठी एका झेंडयाखाली यावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश धामनकर यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अजितदादा पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आम्ही सर्व अजित पर्व,राणा दिलीपकुमार सानंदा आगे हम तुम्हारे साथ है अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
या जिल्हा परिषद सर्कल मेळाव्याला रसुल शाह,जगन्नाथ सुलताने,पुंडलीक ठाकरे, शत्रुघ्न कांडेलकर,दिगांबर थेरोकार, गोपाळ कौसकार, गणेश कापडे,सुर्या कापडे,वैभव पाटील,वैभव वानखडे,पुंडलीक थेरोकार,भरत गावंडे, संदिप वावरे, ज्ञानेश्वर कांडेलकर,जुगलकिशोर गांधी,कल्पेश बावस्कर,सचिन जैस्वाल,संजय वानखडे,अनिल देशमुख, दशरथ थेरोकार,पुंडलीक ठाकरे यांच्यासह सुटाळा-वाडी जिल्हा परिषद सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments