Advertisement

वाहन चालक हा देशाचा सैनिकच,,, रामेश्वर गायकी पत्रकार व पोलिसांचा जळगाव जामोद येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न



वाहन चालक हा देशाचा सैनिकच,,, रामेश्वर गायकी 

 पत्रकार व पोलिसांचा जळगाव जामोद येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न!

जळगाव जामोद : येथे दिनांक १0 जानेवारी २०२६ रोजी डायमंड ट्रान्सपोर्ट समोर संघर्ष वाहन चालक-मालक युनियन संघ, जळगाव जामोद यांच्या वतीने पत्रकार दिन व पोलीस स्थापना सप्ताह दिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातून प्रथमच भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एक्सप्रेस न्युज भारत नॅशनल टीव्ही चॅनल चे पत्रकार राजेंद्र ससाणे व अहिल्या न्युज 24 मिडिया ग्रुप चे संपादक शिवदास सोनोने, उप संपादिका सौं गीताताई सोनोने व कार्यकारी संपादिका सौं सरलाताई ससाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

तसेच जिल्ह्यातील समस्त पत्रकार बांधव तथा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
त्यावेळी सत्कार सोहळा संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष सय्यद जुनेद भाई व महासचिव अमजद खान यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच खामगाव, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर, जामोद, सुनगाव व स्थानिक जळगाव जामोद येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, वाहन चालक हा दैनंदिन जीवनात व देशाच्या दळणवळण व्यवस्थेसाठी सैनिकाप्रमाणेच कार्य करतो. मात्र प्रवास व कामकाजादरम्यान त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी पोलीस प्रशासन व पत्रकार बांधवांकडून त्यांना मोलाचे सहकार्य मिळते. भविष्यातही हे सहकार्य अखंड सुरू राहावे, तसेच पोलीस प्रशासनाने वाहन चालकांकडे देशसेवेतील सैनिक म्हणून पाहावे, या भावनेतून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद हुसेन होते. प्रमुख उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष सय्यद जुनेद, महासचिव अमजद खान, अब्दुल मोहीम, अब्दुल हफिस, अनिस खान, जमवला खान, वैभव परिवार, समीर खान मिर्झा, सुफीहान शेख, मुस्ताक मोहम्मद, मुदसिर शेख, जावेद सागर, प्रल्हाद, संघटनेचे फाउंडेशन मेंबर तसेच बाबू जमदार, अनिल जैस्वाल,पोलीस स्टेशनं चे  psi मोहोळ साहेब, psi सिरसाठ साहेब टाऊन चे हेड वेरूळकर साहेब, राजवीर सिंग राठोड,सुनील अग्निहोत्री,सौं गीताताई सोनोने, सौं सरलाताई ससाणे फारुख अहमद, सय्यद मोसिन, लियाकत खान, जावेद बॉक्सर, अब्दुल साजिद, जाकीर नाना, सय्यद शमीम, दिलीप दाभाडे, आकाश वानखडे, ओम ठाकूर, महेश भाई तेलारा, राजपाल दामोदर सय्यद हकीम, फारुख भाई आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम चे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनी केले,तर आभार  जुनेद भाई यांनी केले

या कार्यक्रमामुळे वाहन चालक-मालक संघटना, पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Post a Comment

0 Comments