Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. शाळा क्र. ७ मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा**सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या मातांचा गौरव. खामगांव/(संतोष आटोळे)

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. शाळा क्र. ७ मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या मातांचा गौरव*
खामगांव/(संतोष आटोळे)
    खामगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र. ७ येथे  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक नगरसेवक अशोक हट्टेल व सौ. कांताताई पवार यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, नृत्य व भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जवरे सर यांनी स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचा इतिहास उलगडत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अमोल बुट्टे यांनी भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क व कर्तव्यांवर प्रकाश टाकला.
भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांच्या मातांचा विशेष सन्मान करण्यात आला. सौ. वंदनाताई मिसाळ, सौ. संगीताताई सारथी व सौ. मंदाताई हिवाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. 
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वातावरण भारावून गेले होते. लहानग्यांच्या देशभक्तिपर गाण्यांनी व नृत्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राठोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

त्यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक चंद्रकांत जवरे सर, विजय पाटील सर, ज्ञानेश्वर राठोड सर, शिक्षिका पायल बघेल, कोमल पवार, शाळा समितीच्या अध्यक्षा सिंधुताई पहुरकर, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक तायडे, अमोल बुट्टे, निलेश पवार, अनिल सातपुते, विठ्ठल मिसाळ, बबन तांबटकर, विनोद बघेल, राहुल कोल्हे, जीवन जाधव, विक्की खराडे, आदित्य गायकवाड, विशाल घोगल यांच्यासह पालक व शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments