Advertisement

टिळक राष्ट्रीय विद्यालय हे मूल्य संस्काराचे केंद्र - प्राचार्य श्री बोदडे सर* *शालेय जीवनात कष्ट घेतल्याशिवाय यश संपादन होत नाही - श्री अशोकभाऊ सोनोने* खामगाव/(संतोष आटोळे)

*टिळक राष्ट्रीय विद्यालयाचा 106 वा संस्था वर्धापन दिन उत्साहात साजरा*
      *टिळक राष्ट्रीय विद्यालय हे मूल्य  संस्काराचे केंद्र - प्राचार्य श्री बोदडे सर* 
     *शालेय जीवनात कष्ट घेतल्याशिवाय यश संपादन होत नाही - श्री अशोकभाऊ सोनोने* 
 खामगाव/(संतोष आटोळे)
        स्थानिक टिळक राष्ट्रीय विद्यालयात संस्थेचा 106 वा संस्था वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष माननीय श्री सुधाकर अजबे गुरुजी होते तर सत्कारार्थी म्हणून प्राचार्य श्री शालिग्राम बोदडे सर आणि श्री अशोकभाऊ सोनोने होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ विश्वस्त माननीय श्री अशोकभाऊ झुनझुनवाला , माननीय श्री रमेश दादा दाणे, सचिव तथा मुख्याध्यापक श्री संजय पातुर्डे गुरुजी तसेच बोदडे मॅडम आणि सोनोने मॅडम  मंचावर उपस्थित होत्या.                         प्रास्ताविक करताना सचिव तथा मुख्याध्यापक श्री  संजय पातुर्डे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि संस्थेचे भविष्यातील उपक्रम सांगितले. सत्कारमूर्ती प्राचार्य श्री बोदडे सर  यांचा परिचय शिक्षक श्री संजय जारे यांनी तर दुसरे सत्कारमूर्ती श्री अशोकभाऊ सोनोने यांचा परिचय शिक्षक श्री अरुण भगत यांनी करून दिला.प्राचार्य श्री बोदडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना टिळक राष्ट्रीय विद्यालय हे मूल्य संस्काराचे केंद्र आहे असे सांगितले. श्री अशोकभाऊ सोनोने यांनी शालेय जीवनात कष्ट केल्याशिवाय पुढील आयुष्यात यश मिळत नाही हे आवर्जून सांगितले. तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही मदत करण्यास मी सदैव तुमच्या सोबत आहे असे सांगितले. विश्वस्त श्री रमेशदादा दाणे यांनी मनोगत व्यक्त करताना टिळक राष्ट्रीय विद्यालय हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर पूर्वीही होती ,आजही आहे ,आणि उद्याही राहील असे सांगितले. अध्यक्षीय भाषण करताना  माननीय श्री अजबे गुरुजी यांनी समाजातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचा सत्कार करून संस्था आपले सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करते. यावेळी संस्था वर्धापन दिनानिमित्त विविध आयोजित स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. संस्था वर्धापन दिनी विद्यार्थी बचत बँक भगत गुरुजी यांच्या प्रयत्नांतून सुरू करण्यात आली. 


कु. गौरी बेनीवाल आणि कु.कोमल सावरकर तसेच श्री विजय जाधव गुरुजी यांनी केले. आभार प्रदर्शन प्राथमिक मुख्याध्यापक श्री राठोड गुरुजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व शिक्षक महाजन सर, आडे गुरुजी, पुंडकर गुरुजी,ज्ञानेश्वर काळे ,विशाल उकरडे गुरुजी,बावणे सर, शितल बंड मॅडम, लाहोरे मॅडम,प्राचार्य झाडोकार साहेब, प्राचार्य दीपक हिवराळे,वसतिगृह अधीक्षक चंद्रकांत सर,गिरी गुरुजी,सरस्वती सेवक,विजया सोहनी,पुष्पाताई अजबे ,गजानन भगत,पंचायत राज प्रशिक्षण केंद्र , वसतिगृह विभाग,चित्रशिल्प महाविद्यालय,मधुबन शेती विभाग या सर्व विभागाचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments