Advertisement

श्री सदगुरू गणपत बाबा पुण्यतिथी व विश्वकर्मा जयंती निमित्त गरजुंना कपडे वाटप



*श्री सदगुरू गणपत बाबा पुण्यतिथी व विश्वकर्मा जयंती निमित्त गरजुंना कपडे वाटप*
*श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचा उपक्रम* 

स्थानिक सतिफैल परिसरातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 26 वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे  "मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ मे "  हे ध्येय घेऊन ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळ चे अन्न नाही अशा समाजातील उपेक्षिता प्रती आपले पण काही देने लागते हा उद्देश समोर ठेवून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गरीबांना नेहमी मदत करणारे मुन्ना भाऊ शर्मा यांनी सन २००० मध्ये ह. भ. प.गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ महाराज  मंडळाची स्थापना केली  भजनाच्या माध्यमातुन आज पर्यंत निस्वार्थ अखंडपणे अनेक उपक्रम सुरू आहेत माणुसकी गोठल्या सारख्या समाजात आज ही काही ठिकाणी वृध्द आई वडिलांना घराबाहेर काढले जाते तसेच काम करण्यास असमर्थ असलेल्या अंध. अपंग व्यक्तींना ही वाऱ्यावर सोडले जाते कुटुंबाकडून झिडकारलेल्या अशा निराधारांना उघड्यावर भीक मागून जीवन जगावे लागते खामगाव शहरात व परीसरात अनेक निराधारांचे वास्तव्य असुन ते थंडी. ऊन. पावसात कसाबसा जीवन संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसुन येत आहे नियतीने असे जीवन त्यांच्या वाट्याला आले असून नरकयातना सहन करत ते दिवस काढत आहे 

28 जानेवारी 2026 बुधवार रोजी माघ शुध्द दशमी श्री सदगुरु गणपत बाबा पुण्यतिथी व श्री विश्वकर्मा भगवान जयंती चे औचित्य साधुन शहरातील रेल्वे स्टेशन. बस स्थानक. शनिमंदिर.हनुमान मंदीर.फरशी आदी ठिकाणी  जाऊन गोरगरीब लोकांना कपडे वाटप करण्यात आले 
सर्व प्रथम श्री सदगुरु एकनाथ महाराज व भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करून माल्याअर्पण करण्यात आले या नंतर आज सकाळी विमान दुरघटनेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार व त्यांचे सहकारी यांचे दुखद निधन झाले त्यांना  भावपूर्ण श्रद्धाजली वाहण्यात आली या प्रसंगी  ह, भ, प श्री जयरामजी खर्चे महाराज रानमळा धुळे. ह, भ, प, शालीग्राम देशमुख महाराज.सेवानिवृत्त पी एस आय शेषरावजी अंभोरे.भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. अरूण कडवकर. दिलीप झापर्डे. लालाजी सांगळे, सागर ठाकूर. दादा ठाकूर.विक्की माने.सुशिला आवलकर. आशा अंधारे.शकुंतला ढवळे. पार्वती सुकाळे.
संगिता वाघोळे.  जयश्री झापर्डे.जया सुकाळे. शोभा ठाकूर. अंबिका काटकर. वच्छला कुटे. श्रीराजबाई ठाकूर. चैताली फंड.पुजा लाड.व मंडळाचे सर्व सदस्य व परीसरातील  नागरिक उपस्थित होते  मंडळाच्या वतीने वृक्षारोपण.रक्तदान.गोरगरीबांना भोजन वाटप. पक्ष्यांच्या करीता पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्ष भर राबविल्या जातात त्या निमित्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांना अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments