Advertisement

पिंपळगाव काळे येथे धाडसी चोरी: ७४ हजारांचा ऐवज लंपास; जळगाव जामोद तालुक्यात चोरांचा सुळसुळाट..!

पिंपळगाव काळे येथे धाडसी चोरी: ७४ हजारांचा ऐवज लंपास; जळगाव जामोद तालुक्यात चोरांचा सुळसुळाट..!

तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोखीसह एकूण ७४,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या रात्री (२६ जानेवारी) ही घटना घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.​शिवाजी नगर येथील रहिवासी बंडू भगवान पाटील (४९) हे २६ जानेवारीच्या रात्री नेहमीप्रमाणे घरी झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला. २७ जानेवारी रोजी सकाळी ५:०० वाजता ही चोरी झाल्याचे मालकाच्या निदर्शनास आले.त्यामध्ये
​चोरट्यांनी लंपास केलेला मुद्देमाल:​सोन्याची गहुमणी पोत: २५ ग्रॅम (अंदाजे ३०,००० रुपये)
​सोन्याची डोरले मणी पोत: २० ग्रॅम (अंदाजे ३०,००० रुपये)
​कानातले वेल: ५ ग्रॅम (अंदाजे १०,००० रुपये)​नगदी रक्कम: ४,००० रुपये,​या चोरीच्या घटनेमुळे जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे.पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात ही गस्त केवळ 'मोजक्याच' ठिकाणी दिसून येते.तसेच बीट अधिकारी आणि पोलीस कर्मचारी केवळ फोटो सेशनसाठी गाडीच्या बाहेर पडतात का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कागदोपत्री गस्त दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात गुन्हेगारांवर वचक बसवण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. काल रात्री त पिंपळगाव काळे गावामध्ये पाच ते सहा ठिकाणी चोरी झाल्याचे समजते त्यामध्ये दोन मोटरसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या त्या पळशी गावाजवळ मिळुन आल्या आहेत.

_____________________
तालुक्यातील सुरक्षा व्यवस्था सध्या 'राम भरोसे' असून, बीट अधिकाऱ्यांच्या ढिल्या कारभारामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे.​"गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी केवळ सोपस्कार न पार पाडता, प्रभावी गस्त घालून गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी." - स्थानिक नागरिक
_____________________
​फिर्यादी बंडू पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (४) बी.एन.एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल पंडित व परमेश्वर ढोण करीत आहेत.
​आता पोलीस प्रशासन या प्रकरणाचा छडा लावून आपली प्रतिमा सुधारणार की चोरांचे सत्र असेच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments