Advertisement

पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय तर्फे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास आरंभ* *खामगाव /( संतोष आटोळे )

* *पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय तर्फे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास आरंभ* 
 *खामगाव /( संतोष आटोळे )
               पिंपळगाव राजा येथे दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालया तर्फे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन करण्यात आले.   
                   राष्ट्रीय सेवा योजना केवळ उपक्रम नाही, तर समाज घडवणारी चळवळ आहे. समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहोचवणे, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि जनजागृती साठी काम करणे  हा यामागील प्रमुख हेतू आहे. 
               ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कवीश्वर सर होते तर उद्घाटक डॉ. अजिंक्य कवीश्वर सर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सय्यद सर यांनी मांडले तर यावेळी डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. निशांत मुखिया डॉ. मंगेश वाघ डॉ. माधुरी वानखेडे  आणि डॉ. प्रणिता ताठे व विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी पिहूल (अंतिम वर्ष BHMS) यांनी केले.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून तसेच "इतनी शक्ती हमे देना दाता " या प्रार्थनेने उत्साहात झाली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणताना डॉ. सय्यद सर यांनी दिनांक 19 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 पर्यंत होणाऱ्या या शिबिराची रूपरेषा सांगितली तसेच यावर्षी  "Healthy Youth, Healthy Nation For Sustainble Devlopment"( निरोगी तरुण सक्षम राष्ट्र, शाश्वत विकास ) हे संकल्पना घेऊन हे शिबिर राबवण्यात येणार आहे. तसेच परिसरातील 1000 घरातील सदस्यांचे आरोग्याच्या संरक्षण करून त्यांना योग्य तो उपचार देणे हा या मागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
                तदनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.  अजिंक्य कवीश्वर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत सदर उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा मुख्य हेतू सेवा देणे आहे व त्याचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे याची जाणीव करून देत पुढील सर्व दिवसांसाठी शुभेच्छा दिल्या 

                 कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कविश्वर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉक्टर म्हणून जगत असताना सामाजिक बांधिलकीची आपल्याला जाण असली पाहिजे. रुग्णांचे उपचार करणे व त्यातून रुग्ण बरा होणे यासारखं दुसर समाधान नाही. तसेच पुस्तकातून घेतलेल्या ज्ञानाचा वापर करण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असे मत मांडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
               कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजना 2026 चे समन्वयक डॉक्टर प्रशांत कुलकर्णी सर यांनी आभार प्रदर्शन करून मान्यवरांच्यावतीने उद्घाटन सोहळा पार पडला हे घोषित केले. अशाप्रकारे पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय तर्फे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा पहिला दिवस उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments