*खामगांव शहरातील नागरीकांच्या विविध समस्या व लोकहितार्थ मागण्यांबाबत शिवसेनेचे नगर परिषदेस निवेदन*
खामगांव नगर परिषदेमध्ये बहुमतात सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील सर्वसामान्य नागरीकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खामगांव शहराच्या वतीने मा. मुख्याधिकारी, नगर परिषद खामगांव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहरातील विविध प्रलंबित प्रश्न, नागरी समस्या व लोकहितार्थ मागण्यांवर सविस्तर चर्चा करून अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्व. भाऊसाहेबजी फुंडकर व स्व. सुभाषरावजी देशपांडे यांनी खामगांव शहरासाठी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आता सत्ताधारी पक्ष कडे आहे. शहरातील सामान्य नागरीकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून लोकाभिमुख, दूरदृष्टीपूर्ण निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
निवेदनाद्वारे पुढील महत्वाच्या लोकहितार्थ मागण्या मांडण्यात आल्या –
*मालमत्ता खरेदी–विक्रीनंतर आकारण्यात येणाऱ्या फेरफार करातील वाढ तसेच रहिवाशी मालमत्तेवरील वाढीव कर आकारणीचा तात्काळ फेरविचार करून ही करवाढ कमी करावी अथवा पूर्णतः रद्द करावी.
*नगर परिषद प्रशासकीय इमारतीस माँसाहेब जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रवेशद्वारावरील कमानीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. गांधी बगीचा समोरील नव्याने उभारण्यात आलेल्या न.प. कॉम्प्लेक्सला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे.
*टिळक मैदान येथे बहुप्रतिक्षित नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तात्काळ उभारण्यात यावा, छत्रपती शिवाजी नगर, सतीफैल, दाळफैल, बाळापुर फैल, चांदमारी, शंकर नगर या भागातील नगर परिषदेच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नियमानुसार ८-अ व नमुना ‘ड’ तात्काळ देण्यात यावे, जेणेकरून स्लम भागातील नागरिकांचे घर खरेदी–विक्री व्यवहार सुरळीत होतील.
*नॅशनल हायवे व शहरातील विविध भागात लावलेले सुरक्षा तार कुंपण तात्काळ काढून टाकावे, कारण त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच अतिक्रमण पथक अधिक सक्रिय करावे.
*अतिक्रमण धारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेता त्यांच्यासाठी पर्यायी जागेची योग्य व्यवस्था करण्यात यावी.
*आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा पाईपलाईनची कामे तात्काळ पूर्ण करावीत तसेच रावण टेकडी व चांदमारी येथील पाण्याच्या टाक्या सुरू करून शहराला मुबलक पाणीपुरवठा करावा.
* बुलडाणाच्या धर्तीवर धर्मवीर शिवसेना नेते संजयभाऊ गायकवाड यांनी प्रत्येक थोर महापुरूषांचे स्मारक जसे उभे केले आहे तसेच खामगांव येथे विविध समाजबांधवांनी व देशप्रेमींनी केलेल्या मागणीनुसार थोर महापुरूषांच्या स्मारकाची खामगांवात सुध्दा उभारणी करण्यात यावी
*खामगांव शहरातील बंद पडलेले गोवंशाचे अवैध कत्तलखाने तात्काळ जमीनदोस्त करून अवैध कत्तलींना पूर्णतः आळा घालावा.
शिवसेना खामगांव शहराच्या वतीने या सर्व लोकहितार्थ मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवसेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.तसेच मालमत्ता खरेदी–विक्रीनंतर आकारण्यात येणाऱ्या फेरफार करातील वाढ तसेच रहिवाशी मालमत्तेवरील वाढीव कर आकारणीवर हरकती नोंदवण्याकरिता नागरिकांसाठी शिवसेनेकडून नगरपरिषद येथे दिनांक 27 जानेवारीपासून कायदेशीर तज्ञ मदत व कागदपत्र मार्गदर्शन कक्ष चालू करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना नेते अँड अमोल अंधारे, राजू बघे, चेतन ठोंबरे यांनी दिली यावेळी
निवेदन देतावेळी संजयजी अवताडे (जिल्हा उपप्रमुख, शिवसेना),
शिवसेना नेते अँड अमोलजी अंधारे ( हिंदू सेवक)
राजेंद्र रामदास बघे ( तालुका प्रमुख, शिवसेना)
चेतन मोहनराव ठोंबरे (शहर प्रमुख)
*राहुल पुंजाजी कळमकार (युवासेना शहर प्रमुख)
सौ. जयश्री देशमुख (तालुका महिला आघाडी)
शिवसेना महिला आघाडीच्या सौ. श्रुतीताई पतंगे,
विक्की सारवान ( विद्यार्थी सेना) तसेच शिवसेनेचे सुरेश वावगे,आशिष लांडगे,गोपाल भिल्ल, परवेज पठाण, भाऊ बिडकर, उमेश तायडे
यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला शक्ती व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments