श्री. संजय खंडेराव यांना खामगांव रत्न, श्री. हनुमान व्यायाम मंडळ ला खामगांव गौरव, बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्कार श्री. अनिल खोडके यांना तर युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्काराने सुरज बोराखडे सन्मानित.
खामगांव- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती दरवर्षी सहा जानेवारी रोजी
पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त खामगाव प्रेस क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
सदर पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्लब चे अध्यक्ष किशोर आप्पा भोसले होते. तर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक भाऊ सोनोने, एसडीओ डॉ. पुरी साहेब, तहसीलदार सुनील पाटील साहेब, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर राजेशजी राजोरे, चंद्रकांतजी रेठेकर,अमोलभाऊ अंधारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून विद्येची देवता माँ सरस्वती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, आद्य महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.खामगांव रत्न संजय खंडेराव, खामगांव गौरव श्री. हनुमान मंडळ खामगांव, बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्कार श्री. अनिल खोडके तर युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्कार श्री. सुरज बोराखडे यांना प्रदान करण्यात आला.
तसेच जेष्ठ पत्रकार राजेशजी राजोरे यांनी पत्रकारीतेत पीएचडी केल्याबद्दल तर नवनिर्वाचित नगरसेवक सतीशअप्पा दुडे, पत्रकार तहसीन शाह आणि पत्रकार श्रीकांत भुसारी यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सौ. ज्योती भुसारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश राजोरे, संचलन अनिल गवई तर आभार प्रदर्शन किशोर आप्पा भोसले यांनी केले.
0 Comments