Advertisement

सुरभी ॲड्स अँड एंटरप्राईजेसचे भव्य उद्घाटन..!

सुरभी ॲड्स अँड एंटरप्राईजेसचे भव्य उद्घाटन..!
प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर बुलढाणा शहरातील संगम चौक येथे प्रो. प्रा. कैलास चंदन पसरटे यांच्या सुरभी ॲड्स अँड एंटरप्राईजेस या नव्या व्यावसायिक उपक्रमाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. याच वेळी माझ्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड, नगरपालिकेचे गटनेते युवानेते श्री. मृत्युंजय संजय गायकवाड तसेच सर्व सभापती व नगरसेवक यांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाताई राठोड, शिवसेना जिल्हा महिला आघाडी समन्वयक अनुजाताई सावळे, मुख्य पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, शहरप्रमुख आशिष जाधव, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख मयुरीताई देशपांडे यांच्यासह सर्व नगरपरिषद सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार व पसरटे परिवार उपस्थित होते. संपूर्ण परिसरात ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषाचे वातावरण होते.


उद्घाटनप्रसंगी प्रो. कैलास पसरटे यांचे अभिनंदन करत सुरभी ॲड्स अँड एंटरप्राईजेस या उपक्रमास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा उद्योग स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे माध्यम ठरेल आणि बुलढाण्याच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्यात एक भावनिक व लक्षवेधी क्षण अनुभवायला मिळाला. प्रो. कैलास पसरटे यांनी आपल्या छातीवर माझा फेटा परिधान केलेला फोटो गोंदवून त्याखाली “माझा विठ्ठल” असे शब्द कोरले. त्यांच्या या कृतीतून कार्यकर्त्यांचे आपुलकीचे नाते, विश्वास आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून आला.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उद्योग, विकास, समाजसेवा आणि नेतृत्व यांचा संगम साधणारा हा सोहळा बुलढाणा शहराच्या सामाजिक व राजकीय जीवनात लक्षवेधी ठरला.

Post a Comment

0 Comments