Advertisement

सरस्वती विद्या मंदिर च्या कु.आर्या राजपूत ची राज्यस्तरावर निवड*खामगांव/(संतोष आटोळे)

*सरस्वती विद्या मंदिर च्या कु.आर्या राजपूत ची राज्यस्तरावर निवड*
खामगांव/(संतोष आटोळे)
           क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे विभागस्तरीय कुडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मातोश्री जयाबेन जीवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदिर मधील वर्ग 8 वी मराठी माध्यम वयोगट 14 वर्षाआतील,  वजनगट 60+ मधून कु.आर्या सचिन राजपूत ही विद्यार्थीनी विभागस्तरीय कुडो स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी होऊन तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल शाळेचे संचालक मंडळ ,शाळेच्या प्रधानाचार्य सौ. सुषमाताई टिकले, सौ मेघाताई गोटी, सौ दिपालीताई धारव , श्री संदीप मुरकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

              आर्या हिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments