Advertisement

शिरसगाव देशमुख ग्राम पंचायत च्या वतीने दिव्यांग बांधवांचा हक्काचा ५% निधी वाटप*खामगाव (संतोष आटोळे)

*शिरसगाव देशमुख ग्राम पंचायत च्या वतीने दिव्यांग बांधवांचा हक्काचा ५% निधी वाटप*
खामगाव (संतोष आटोळे) ग्रामपंचायत स्तरावर असलेला दिव्यांग स्वनिधीचे वर्ष २०२५-२०२६ चे वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सरपंच सौ. सुवर्णा श्रीकृष्ण टिकार, उपसरपंच अल्ताफ पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पिंटूभाऊ टीकार, दिव्यांग शक्ती चे संपादक व विराट मल्टिपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक व ग्रामसेवक धनोकार हे उपस्थित होते.
सदर शिरसगाव देशमुख येथे  ५% निधी  जवळपास ४० दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक धनोकर यांनी सांगितले की, आमची ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकऱ्यांच्या सहकायनि गावातील विकास कामे करत असताना दर वर्षी दिव्यांग बांधवांना
स्वनिधी वितरित करण्यात येतो. त्यांच्या अडचणी सोडविणे आलेल्या योजनांची माहिती त्यांना ग्रा. पं. च्या माध्यमातून देत त्याच्या विकासासाठी लक्ष देत असते.

यावेळी ग्रा.पं. मधील सर्व नोंदणीकृत ४० दिव्यांग बांधवांना चेक स्वरूपात निधीचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments