Advertisement

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये आविष्कार स्नेहसंमेलनाची उत्साहात शुभारंभ ..विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये आविष्कार स्नेहसंमेलनाची उत्साहात शुभारंभ

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

खामगाव - (संतोष आटोळे)             *जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स, गुंजकर कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय तसेच गुंजकर महाविद्यालय, आवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘आविष्कार’ स्नेहसंमेलनाचा आज ११ जानेवारी  मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.
     कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वीय सहाय्यक विलास राजे जाधव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कला व क्रीडा क्षेत्रातही प्रगती साधावी, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार तावडे, मेस्टा (MESTA) चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत चोपडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सागर उकर्डे, आवारचे पोलीस पाटील संदीप खराबे, पत्रकार अशोक जसवाणी, सामाजिक कार्यकर्ते रवी जोशी उपस्थित होते.


    स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक व गायन यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी साकारलेले विविध शैक्षणिक प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. आवार व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी या स्नेहसंमेलनातून मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर व सचिव सौ. सुरेखा रामकृष्ण गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संधी उपलब्ध करून देणे हा या स्नेहसंमेलनामागील मुख्य उद्देश असल्याचे प्राचार्य सतीश रायबोले यांनी सांगितले. दरम्यान, उद्या स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धांचे आयोजन व पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असून, परिसरातील पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॉलेज प्रशासनाच्या आणि संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे*

Post a Comment

0 Comments