शासनाचे नियम धाब्यावर बसवून जलंब - खामगाव रोडवर रात्रभर सुरू असते अवैध रित्या रेतीची तस्करी.
महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष.
जलंब = शासनाचे नियम धाब्यावर बसवून जलंब - खामगाव रोडवर खुलेआम पणे काही बडे रेती माफिया हे कुणालाही न भिता पूर्णा नदीपात्रातून रात्रभर वाहनाने अवैध रित्या रेतीची वाहतूक सुरू असल्यामुळे रोड च्या आजूबाजूला राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रात्रभर वाहतूक करणाऱ्या या वाहनधारकावर महसूल प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी हि जलंब,माटरगाव, पहुरजिरा येथील नागरिकांनी केली आहे..
याबाबत वृत्त असे की शासकीय नियमाप्रमाणे सकाळी 6 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत रेतीची वाहतूक करण्याची मुभा दिली आहे परंतु शासनाच्या या आदेशाची पाय मल्ली करून काही बडे रेती माफिया हे पूर्णा नदी पात्रातून रात्रभर अवैध रित्या वाहनाने खुलेआम रेतीची वाहतूक करीत आहे .त्यामुळे सदर वाळु माफियाविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
जलंब - खामगाव रोडवर जवळपास रात्रभर 50 ते 60 वाहने पूर्णा नदी पात्रातून अवैध रित्या रेतीची वाहतूक करीत असल्यामुळे रोडच्या आजूबाजूला राहणाऱ्या घरातील नागरिकांना व रोडच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत असून या आवाजामुळे त्यांना झोपणे सुद्धा कठीण झाले आहे. तर रात्रभर वाहनाने जलंब - खामगाव रोडवर रेतीची खुलेआम वाहतूक सुरू असताना सुद्धा त्यांच्यावर महसूल प्रशासनाचे अधिकारी का दुर्लक्ष करतात असा सवालही नागरिक करीत आहे. पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात रात्रभर रेतीची तस्करी केली जात असून यामधून अनेक वाळू माफिया गब्बर झाले असून ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत असल्याचे समजते . तर रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती माफियांनी वेळेचे सुद्धा भान ठेवले आहे तर यामुळे तालुका प्रशासनाचा कोट्याधी रुपयाचा महसूल बुडत असून याकडे मात्र महसूल प्रशासनाची बग्याची भूमिका घेतल्या जात असल्यामुळे या वाळू माफियांचे आता मुस्क्या कोण आवरणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे..
तर परिसरातील रेती तस्करांचे रोडवर विशेष पथक तैनात असून रात्रभर चारचाकी वाहनाने पेट्रोलिंग करून रोड क्लिअरच्या मोबाईल द्वारे सूचना देऊन मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेतीची वाहतूक करून महसूल प्रशासनाची दिशाभूल करतात पण प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प असल्याची चर्चा आहे..
0 Comments