*महिला महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा*
खामगांव/(संतोष आटोळे) स्थानिक श्रीमती सु.रा.मोहता महिला महाविद्यालयात खेळ व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने ,भारतीय तिथी माग महिन्यातील रथसप्तमी शुक्ल सप्तमी या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला गेला .अंकशास्त्र व ज्योतिष शास्त्रानुसार 2026 हे सूर्याचे वर्ष बांधले जाते .जे की नवीन सुरुवात नेतृत्व वैयक्तिक वाढ व शक्तीचे प्रतीक मानले जाते. ज्यात आत्मविश्वास वाढवणारी व जबाबदारी स्वीकारणारी व तेजस्वीपणे चमकणारी ऊर्जा आहे. सूर्यनमस्कार हे प्रभावी व्यायाम प्रकार आहे. तेवढे जास्त सूर्यनमस्कार घालता येतील तेवढे चांगले. सूर्यनमस्कार हा बहुआयामी व्यायाम प्रकार संपूर्ण शरीराला यामुळे व्यायाम होतो. ज्याने शारीरिक, मानसिक आरोग्यास लक्षणीय सुधारणा होऊन सहनशक्ती वाढते.
हृदय व रक्तवाहिन्या सुदृढ होतात.खेळ व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ.सौ.सीमा देशमुख यांनी सूर्यनमस्काराची महती विद्यार्थिनी समोर कथन करून बारा आवर्तनात विद्यार्थिनींकडून सूर्यदेवतेचे वेगवेगळे नाव घेऊन सूर्यनमस्कार काढून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमास प्राचार्य प्रा. हेमा जंवजाळ सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद बहुसंख्येने या कार्यक्रमास हजर होते.
0 Comments