Advertisement

• शिवसेनेचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला• *केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा कंत्राटदाराला धारेवर धरत थेट इशारा*खामगांव/(संतोष आटोळे)

*१०वर्षांची दिरंगाई संपणार !
घारोड येथील साठवण तलावाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले*

• शिवसेनेचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला
• *केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा कंत्राटदाराला धारेवर धरत थेट इशारा*
खामगांव/(संतोष आटोळे)
           खामगाव तालुक्यातील घारोड येथील गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या साठवण तलाव क्रमांक २ चे काम अखेर सुरू होणार असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खोदून ठेवूनही पाणी साठवण शून्य राहिली होती. अखेर शिवसेनेच्या ठाम भूमिकेमुळे हा अन्याय संपुष्टात येणार असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांना लाभ देणारा हा प्रकल्प कागदावरच ठेवून प्रशासन व कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या गंभीर प्रश्नाची माहिती मिळताच शिवसेनेचे ॲड. अमोल अंधारे व तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांनी कोणतीही दिरंगाई न करता थेट प्रकल्पस्थळी धडक दिली. जलसंधारण विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांना घटनास्थळी बोलावून जाब विचारण्यात आला.

     दरम्यान, घटनास्थळीच केंद्रीय मंत्री मा. श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांना वस्तुस्थिती कळवण्यात आली. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित कंत्राटदाराला थेट फोन करून तात्काळ काम सुरू करण्याचे स्पष्ट व कडक आदेश दिले. कामात आणखी चालढकल सहन केली जाणार नाही, येत्या काळात संबंधीत विभागाचे अधिकारी शेतकरी बांधव व कंत्राटदार यांची सविस्तर बैठक व चर्चा करून शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला व प्रकल्पाचा लाभ लवकरात लवकर मिळून  देण्याचा प्रयत्न करु 
या ठोस निर्णयामुळे दशकभर त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, ॲड. अमोल अंधारे, राजेंद्र बघे व शिवसेनेचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी सरपंच वैभव ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य माथनकार,किसन इंगळे,संजय गायकवाड,विश्वनाथ गायकवाड,भगवान बोरे,निलेश इंगळे,गोपाल दूतोडे,यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments