Advertisement

लायन्स एक्सपो 2026 चे थाटामाटात भूमिपूजनसंपन्न* खामगांव/(संतोष आटोळे)

*लायन्स एक्सपो 2026 चे थाटामाटात भूमिपूजनसंपन्न* 
खामगांव/(संतोष आटोळे)
          स्थानिक लॉयन्स क्लब खामगाव द्वारे दरवर्षी खामगाव शहरांमध्ये लायन्स एक्सपोचे आयोजन केले जाते.लायन्स एक्सपो आयोजनाचे खामगावकरच नव्हे तर परिसरातील गावागावांमध्ये नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी एक्सपो 2026 चे आयोजन 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान नियोजित शासकीय तंत्रनिकेतन मैदान या ठिकाणी केल्या जात आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी प्रमुख अतिथी लायन अनिलजी नावंदर व पि डी जी एम जे एफ ला डॉ अशोक बावस्कर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.    

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लब खामगाव चे अध्यक्ष लॉयन तुषार कमानी प्रमुख उपस्थितीमध्ये लायन राजेंद्रजी नहार, लायन रमेश भुतडा उपस्थित होते. यावेळी एक्स्पो चेअर पर्सन एम जे एफ लॉयन डॉ निखिल लाठे, यांनी एक्सपोचे विशेष आकर्षण अम्युजमेंट मध्ये सर्कसची भर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लब खामगाव चे सचिव लॉयन डॉ गिरीश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन एक्सपो सचिव लॉयन डॉ धनंजय तळवणकर यांनी केले. भूमिपूजन समारोहाला लायन्स क्लब खामगाव चे कोषाध्यक्ष लायन कुणाल भिसे, एक्सपो कोषाध्यक्ष लायन राजेश झांबड, पास्ट प्रेसिडेंट लॉयन डॉ परमेश्वर चव्हाण, लायन अशोकजी केला, लायन दिनेश गांधी, लायन नंदकिशोर देशमुख, लॉयन पिनेश कमानी, लॉयन मितेश कमानी, लायन लोकेश मुदलियार, लायन डॉ केशव मेंढे, लायन मनोज बडजाते, लायन कुलबीर सिंग पोफळी, लायन रमेश भुतडा, लायन हर्षा कमानी, नेहा कमानी, लायन स्नेहा कमानी, लायन नम्रता लाठे, लायन शितल देशमुख, लायन महेश चांडक, लायन पूनम चांडक, लायन उर्मिला केला, लायन डॉक्टर अपर्णा बावस्कर, लायन आशा तळवणकर, लायन आदर्श जगताप, लायन आरती जगताप, लायन धर्मेश शहा, लायन फाल्गुनी शहा, लॉयन गिरीश धरमठोक, लायन वैशाली धरमठोक, लायन आनंद परदेशी, लायन अमोल घवाळकर, रुपेश रुईकर अकोला,सर्व लायन मेंबर उपस्थित होते. एक्सपोर्ट च्या यशस्वी ते करिता शासकीय तंत्रनिकेतन खामगावचे प्राचार्य सन्माननीय डॉ समीर प्रभुणे यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments