* *संत गजानन बहुउद्देशीय संस्था पारस बुलडाणा फिल्म सोसायटी राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित*
* दिनांक 22फेब्रुवारी 2026रोजी पत्रकार भवन बुलडाणा येथे वाडेकर फिल्म तर्फे राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे मोठया थाटामाटात आयोजन करण्यात आले होते.
* दरवर्षी गुणवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
* सदर पुरस्कार हा संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था पारस यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात नावाजलेल्या समाजसेविका तथा संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था पारस अध्यक्षा सौ.चंदाताई ददगाळ यांना चित्रपट कलावंत मोहन काळे, नाट्य व चित्रपट कलाकार सुभाष बावस्कर,अभिनेते व कुरेशी, नाट्य कलावंत गणेश तांगडे, संस्थापक अध्यक्ष भास्कर वाडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
* बुलडाणा फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष भास्कर वाडेकर गेल्या 34वर्षा पासून बुलडाणा क्षेत्रात काम करीत आहे. त्यांनी आतापर्यंत 30 शॉर्ट फिल्म व 32माहितीपट तयार केलेले आहे. त्यांनी निर्मिती केलेले शॉर्ट फिल्म 20 देशात व भारतातील 16 राज्यात शंभरहून अधिक फेस्टिवल मध्ये निवड झालेली आहे.
* सदर फिल्म ला 45"बेस्ट फिल्म"पुरस्कार मिळालेले आहे.
0 Comments