*शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात २५ फेब्रुवारी रोजी किन्ही महादेव (फाटा) येथे भव्य शेतकरी मेळावा*
*खामगाव तालुका व परिसरातील
शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या विविध प्रलंबित व गंभीर
प्रश्नांवर सखोल चर्चा करून पुढील लढ्याची दिशा निश्चित
करण्यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले आहे. सदर मेळावा बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी
२०२६ रोजी दुपारी १२ वाजता किन्ही महादेव फाटा,
तालुका खामगाव येथे आयोजित करण्यात येणार
आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला
जातो; मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढते उत्पादन खर्च,
शेतीमालाला न मिळणारा योग्य हमीभाव, पीकविमा योजनेतील
अडचणी, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे मोठे नुकसान, वीजदर
वाढ, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, कर्जबाजारीपणा तसेच
बैंकिंग प्रक्रियेतील गुंतागुंत यांसारख्या समस्यांमुळे शेतकरी
वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या सर्व प्रश्नांवर ठोस
भूमिका मांडून प्रभावी तोडगा काढण्यासाठी हा मेळावा
आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यास शेतकरी नेते
व माजी मंत्री मा. बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार
असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट
भूमिका जाहीर केली जाणार आहे. तसेच या कार्यक्रमास
प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, जिल्हा
संपर्कप्रमुख नितीन आगे, जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते,
उपजिल्हाप्रमुख अजय टप, तालुका अध्यक्ष रामा बोरसे,
यांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यात शेतकऱ्यांना
थेट आपली मते व समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध
करून देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजना
प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात
येईल.तरी सदरहू मेळाव्यास शेतकरी बांधवानी उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
0 Comments