*शिवसेना शहर व तालुका च्या वतीने जुल्मी करवाढ़ विरोधात बैठक संपन्न*
दिनांक23/02/26रोजी मा. ना. प्रतापरावजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शहर व तालुका च्या वतीने तुळजाई टॉवर येथे बैठक पार पडली.
या बैठकी मध्ये मा. ना. प्रतापरावजी जाधव, मा. आ. राणा दिलीपकुमार सानंदा, दै. देशोन्नती चे संपादक डॉ. राजेशजी राजोरे, संचेती जी, नोवाल जी यांची मंचावर उपस्थिती होती.
या बैठकीत अडमाप झालेल्या करवाढी विरोधात वकील संघ,नागरी हक्क समिती संघ, व्यापारी संघासह विविध संघटनानी विरोध दर्शवीत जाहिर पाठिंबा दिला.
या वेळी डॉ. राजेश राजोरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,खामगांवातील जनतेला इतर वर्षी च्या तुलनेत कर हा कित्येक पटीने देण्यात आला असून सर्व नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
या करवाढी करिता मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी काही एक ऐकून न घेता टोलवा टोलवी चे उत्तर दिले. एवढेच नव्हे तर इतर कर हा अर्धा टक्के कर आकारल्या गेला पाहिजे तेथे दोन टक्के आकारल्या गेला.
दरवर्षी च्या तुलनेत नळाचा कर हा 1200रु. वरून थेट 1800रु. आकारल्या गेला.यामुळे जनता होरपळ्या जात आहे.
सर्व संघटनानी आपल्या व्यथा सदर बैठकी दरम्यान व्यक्त केल्या.
इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या नंतर शिवसेनेच्या एक कॉल, प्रॉब्लेम सॉल या ब्रीद वाक्यानुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ जी शिंदे यांच्याशी मा. ना. जाधव साहेब यांनी भ्रमणध्वनीवर करवाढी ची समस्या मांडीत करवाढीला स्थगिती मिळवून दिली. या बाबत उपस्थितांनी आभार मानले.
या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल ऍड. अमोल भाऊ अंधारे, तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांचे कौतुक केले. हे विशेष.
0 Comments