सह्याद्रीच्या कुशीतून सातपुड्यातील पत्रकारितेचा गौरव
संग्रामपूर तालुका ठरला आदर्श
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला असून २२ रोजी कर्जत (रायगड) येथे भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
संग्रामपूरच्या या यशामुळे तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राजकारणाला विकास करण्यासाठी प्रेरणात्मक लिखाण पुरवणारी समाजाभिमुख पत्रकारिता म्हणून संग्रामपूर चा उल्लेख होतो. या पुरस्काराने हे वैशिष्ट्य अधोरेखित झाले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही १९३९ पासून पत्रकारांच्या हितासाठी राबणारी एकमेव मातृ संस्था आहे. परिषदेच्या वतीने दरवर्षी विशेष उल्लेखनीय कार्यासाठी आदर्श पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्काराने
संग्रामपूर तालुक्याच्या पत्रकारितेचा मान उंचावला आहे. अमरावती महसूल विभागातून एकमेव बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर ला कर्जत येथे मुंबई येथील मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर , मावळ चे खासदार शिरंग बारणे माजी खासदार रामशेठ ठाकुर, आमदार महेंद्र थोरवे, वृत्तवाहिनी प्रतिनिधी मंदार फणसे, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, प्रदेश प्रतिनिधी चंद्रकांत बर्डे, जिल्हा अध्यक्ष रणजीत राजपूत, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष अभय आपटे,सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, विश्वस्त किरण नाईक, संजय मोहिते,दर्वेश पालकर, प्रशांत गोपाळे
राहुल देशमुख आदी उपस्थित होते.
राज्य पातळीवरील हा गौरवशाली पुरस्कार सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशा स्वरूपात हा पुरस्कार वितरण करण्यात आला आहे.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची संपूर्ण टीम उपस्थित होती. अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, केंद्रीय जिल्हा कार्यकारी सदस्य श्याम देशमुख, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, सचिव विवेक राऊत, उपाध्यक्ष शेख अब्दुल , उपाध्यक्ष कासम सुरत्ने, कोषाध्यक्ष वासुदेव दामधर, तालुका संघटक श्याम इंगळे, मोहन सोनोने, विभागीय संघटक डॉ. संतोष लांडे, जिल्हा समिती सदस्य आकाश पालीवाल, हल्लाकृती समिती स्वप्निल देशमुख, सागर कापसे,डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष गोपाल धर्माळ, उपाध्यक्ष भगवान पाखरे, ज्ञानेश्वर अतकारे, विठ्ठल निंबोळकार, नंदू पाटील खानझोड आदी पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते.
संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारितेने शहरी तालुक्यांना मागे सारत आपले वेगळेपण सिद्ध केले. या पुरस्कारात सामाजिक प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि ग्रामीण भागातील समस्यांना सातत्याने वाचा फोडत केलेल्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. या सन्मानामुळे तालुक्याच्या पत्रकारितेच्या कार्याला नवी उर्जा आणि व्यापक दिशा मिळणार आहे. डिजिटल युगातही ग्रामीण पत्रकारिता विकासासाठी प्रेरक ठरली असल्याचे या राज्यस्तरीय पुरस्काराने अधोरेखित झाले आहे.
पत्रकारांची मातृसंस्था
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासह पत्रकारितेला प्रोत्साहित करणारी एकमेव संघटना आहे. या संस्थेला प्रा के अत्रे, वि वा शिरवाडकर, रंगा अण्णा वैद्य, वसंत काणे आदी साहित्यिक व विचारवंत अध्यक्ष म्हणून लाभले आहेत.
"अकरा अध्यक्षांचे भाषणांचा होणार संग्रह "
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अकरा अध्यक्षांच्या भाषणांचा संग्रह तयार होत असून हा ग्रंथ पत्रकारितेसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. आजच्या डिजिटल युगात स्पर्धा वाढली असली तरी बातम्यांचे सोर्सेस व ग्राउंड रिपोर्ट साठी ग्रामीण पत्रकार पत्रकारिता टिकवून आहे. असे मुख्य विश्वस्थ एस एम देशमुख यांनी सांगितले.
सातपुड्यातील पत्रकारितेचा विशेष उल्लेख
संग्रामपूर हा आदिवासी बहुल व मागास तालुका म्हणून माहिती होती. परंतु ३५५ तालुक्यांमधून पहिल्या पांच मध्ये येऊन तेथील पत्रकारितेने वेगळा संदेश दिला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी सातपुड्याचा सत्कार करताना विशेष आनंद होत असल्याच्या भावना विचारवंतानी व्यक्त केल्या.
पुरस्कार म्हणजे जवाबदारी याचे भान संग्रामपूर पत्रकार संघ ठेवेल अशा जिल्हा अध्यक्ष रणजीत राजपूत यांच्या सूचनेला विजेत्यांनी दाद दिली.
0 Comments