Advertisement

संम्मान कर्तृत्वाचा हिवरा आश्रम येथे 'भारत गौरव ' देविदास शर्मा यांचा सत्कार**मुर्ती लहान. पण किर्ती महान माणूस पैश्याने किंवा वयाने मोठा होत नसतो ~ आर बी मालपाणी*खामगांव/(संतोष आटोळे)

*संम्मान कर्तृत्वाचा हिवरा आश्रम येथे  'भारत गौरव ' देविदास शर्मा यांचा सत्कार*
*मुर्ती लहान. पण किर्ती महान माणूस पैश्याने किंवा वयाने मोठा होत नसतो ~ आर बी मालपाणी*
खामगांव/(संतोष आटोळे)
     आयुष्य भरात केलेल्या उत्तम कार्याची समाज नकळत दखल घेत असतो मुर्ती लहान पण किर्ती महान माणूस वयाने किंवा पैश्याने मोठा होत नसतो तो आपल्या कर्मा ने मोठा होत असतो या युक्ती प्रमाणे देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचे कार्य म्हणजे एखादी व्यक्ती वस्तू किंवा गोष्ट दिसायला अत्यंत सामान्य लहान किंवा साधी असली तरी तिच कार्य कर्तत्व गुण खुप मोठे आणी प्रभावी असणे बाह्य रूपावरुन कोणाच्याही क्षमतेचा अंदाज बांधु नये कारण खरी मानवता कार्यात असते शरीरात नाही ते कार्य मग लहान असो वा मोठ संत तुकाराम महाराजांनी दिन. दुबळ्यांची. पिडीतांची सेवा हीच खरी इश्वर सेवा मानली आहे त्यांच्या मते जे दुखी आहेत त्यांना आधार देणे म्हणजेच प्रत्यक्ष विठ्ठलाची भक्ती करणे होय चांगली माणसं ही हृदयाच्या ठोक्यांसारखी असतात ठोके दिसत नाहीत पण ते थांबले तर आयुष्यच थांबतं तसंच चांगल्या माणसांचं अस्तित्व नजरेस पडत नाही पण त्यांच्या सहवासा शिवाय जीवनाची गोडीच हरवते समाजात काही जण शांतपणे आपलं कर्तव्य करत राहतात ना कौतुकाची अपेक्षा.ना मानपाण पण त्यांच्या एका बोलाने धीर येतो एका स्मिताने दुःख हलकं होतं

भक्तीच्या मार्गावर ही अशीच माणसं देवाने पाठवलेली दूत असतात 
जशी कृपा अदृश्य असली तरी सतत सोबत असते तसंच सज्जनांचं प्रेम न बोलताही जाणवत राहतं आजच्या धावपळीच्या जगात आपणही समाजा प्रती आपले समर्पण. निस्वार्थ सेवा आणी उल्लेखनिय सामाजिक कार्या बदल समाजातील दुर्लक्षित घटकासाठी गरजुंच्या मदतीसाठी आणी विधायक कार्यासाठी देविदास शर्मा यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजाला नवी दिशा देणारे आहे  त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय व राज्य पातीळवर घेतल्या जात असुन त्यांना भारत गौरव सर्वोच्च संम्मान पुरस्कार. महाराष्ट्र भुषण. बहुजन समाज महाराष्ट्र रत्न. विश्वकर्मा समाज महाराष्ट्र रत्न. छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव. इंडियन एक्सलन्स अवार्ड. नॅशनल आयकॉन अवार्ड. असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सम्मानित झाले आहे त्या निमित्य विवेकानंद आश्रम हिवरा जिल्हा बुलढाणा येथे १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते सर्व प्रथम विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर बी मालपाणी गुरजी व सत्कार मुर्ती देविदास शर्मा. पोलीस अधिकारी शेषरावजी अभोरे यांच्या व मान्यवरांचे हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व पं पु शुकदास महाराज यांच्या मुर्ती ला माल्याअर्पन करून. पुजन करण्यात आले तदनंतर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली या नंतर खामगांव येथील श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांचा आश्राम चे अध्यक्ष आर बी मालपाणी व डॉ प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांच्या हस्ते शाल. हार घालुन. श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी शेषराव अंभोरे. दिलीप झापर्डे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विवेकानंद आश्रम चे अध्यक्ष आर बी मालपाणी. उपाध्यक्ष अशोक थोरहाते. जनसंपर्क प्रमुख प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शेषरावजी अंभोरे. काळे साहेब. दिलीप झापर्डे. मनसुखराव देशमुख. प्रकाश मोरे. अशोक अंभोरे पांढरदेव. भास्कर सरोदे. शिवप्रसाद थुट्टे.टी व्ही कलाकार सुभाष सवडतकर. गजानन वायाळ सर. भागवत येवले सर. गजानन जटाळे पुजारी व विवेकानंद हिवरा आश्रमाचे सदस्य कार्यकते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments