Advertisement

या वेळेत बंद राहील दर्शन’ जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारभक्तांना अल्पकाळासाठी पाहावी लागेल ‘श्रीं’च्या दर्शनाची वाट.

या वेळेत बंद राहील दर्शन’
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार
भक्तांना अल्पकाळासाठी पाहावी लागेल ‘श्रीं’च्या दर्शनाची वाट.

शेगाव : संत गजानन महाराजांच्या भाविकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. ‘श्रीं’च्या दर्शनासाठी काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेगाव येथे २५ फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. ‘श्रीं’चरणी माथा टेकविण्यासाठी राष्ट्रपती मंदिरात जाणार असल्याने २४ व २५ फेब्रुवारीला काही तासांसाठी भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही.
राष्ट्रपतींच्या चोख सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीने २५ ते २८  या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होत आहे. प्रशासनाच्या वतीने राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तयारी पूर्ण केली आहे. जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.

संतनगरीत राष्ट्रपती पहिल्यांदा येत आहेत. त्यांना ‘श्रीं’चे दर्शन घ्यावयाचे आहे. दौऱ्यात त्यांची दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यांना सर्वोच्च राजशिष्टाचार प्रदान करण्यात आलेला असल्याने सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचे उपाय सूचविण्यात आले आहेत.


‘या वेळेत बंद राहील दर्शन’
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी प्रशासनाच्या वतीने संत गजानन महाराज मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने रंगीत तालीम घेतली जाणार आहे. या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ‘श्रीं’चे दर्शन भक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रपती मुर्मु मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता ‘श्रीं’चे दर्शन सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत स्थगित ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू राहील, अशी माहिती संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली. भाविकांनी सहकार्य करावे, अ

Post a Comment

0 Comments