*शिवजयंतीचे औचित्य साधत पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे भव्य आरोग्य तपासणी व होमिओपॅथी औषधोपचार शिबिर संपन्न*
दिनांक १९ फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त स्थानिक पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे श्री महादेव संस्थान सुटाळा बुद्रुक येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उद्घाटन सत्राच्या मंचावर उपसरपंच श्री ज्ञानेश्वर जवळगाव सरपंच पती श्री दिनेश इंगळे,ग्रामपंचायतचे श्रेष्ठ सदस्य श्री रामेश्वर भाऊ दुतोंडे डॉ. यशवंत वानखेडे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले तर अध्यक्षपद प्राचार्य डॉ. अजिंक्य कविश्ववर यांनी भूषवले तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर विप्लव कवीश्वर, डॉ. शरयू थोरात, पवन दुतोंडे,दीपक कोकाटे हे होते. संस्थेचे सदस्य डॉ. यशवंत वानखेडे यांनी प्रास्ताविक केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व होमिओपॅथीक हे रुग्णांकरिता अत्यंत उपयोगी व परवडणारे असे शास्त्र असल्याने जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.
सदर शिबिरामध्ये सुमारे 100 रुग्णांनी आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचाराचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये डॉ. वानखेडे,डॉ. विप्लव कवीश्वर, डॉ. शरयू थोरात तसेच पीजी डॉ. अजय सुतार डॉ. अपूर्वा रंगारी डॉ.निकिता कराळे, डॉ.श्रद्धा पलहाडे,डॉ. वैष्णवी कडू, डॉ. कल्याणी राऊत, इंटर्न्स डॉ. वैष्णवी पवार, डॉ. कल्याणी शेंदुरकर तृतीय वर्ष निलेश केकन, सौरभ बावस्कर, विशाल खंडेलवाल, परितोष कंकाळ, भूषण काथोळे, स्नेहल वडोदे, निदा खान यांनी आपली सेवा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण काथोळे तर आभार प्रदर्शन स्नेहल वडोदे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजना करीता दिनेश परदेशी, मंगेश इंगळे,गौरी काटोले यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments