**पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय खामगाव च्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष म्हणून म्हणून डॉ.बाबासाहेब कवीश्वर (अध्यक्ष पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव उपस्थित होते)
प्रमुख उपस्थितीमध्ये सौ मंगला विरेंद्र कवीश्वर (सचिव पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव) यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश राजोरे संपादक दैनिक देशोन्नती खामगाव उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. अजिंक्य कविश्वरा(प्राचार्य) डॉ.वाय. एम. वानखेडे (सदस्य) डॉ. विप्लव कवीश्वर (सांस्कृतिक समिती प्रमुख) डॉ. पी.जी.मुखीया आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक डॉ.अजिंक्य कवीश्वर यांनी केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार केले. तसेच शिवरायांच्या जीवनातील विविधतेतील घटना वर आधारित नाटिका प्रथम व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्या द्वारे सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी विविध गाण्यावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.आयोजितभाषण स्पर्धेत एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आजचे समाज व्यवस्था व शिवरायांचे प्रशासन तसेच आदर्श राज्यव्यवस्था या विषयावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली अंतिम वर्षातील विद्यार्थिनी मृणाल देशमुख यांनी प्रथम क्रमांक तर सृष्टी पीहुल ने द्वितीय क्रमांक मिळविला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे श्री डॉ. राजेश राजोरे यांनी आपल्या भाषणात होमिओपॅथिक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणाबद्दल जनसेवेची भावना आत्मसात करावी असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब कविश्वर यांनी शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष, सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी जनतेचे राजे होते असे सांगून, त्यांची राज्यव्यवस्था आजही आदर्श असल्याचे प्रतिपादन केले.
पाहुण्यांचा परिचय डॉ. स्वाती गजघाने यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश तांदळे, समृद्धी चंदन, च,चेतना जैन, कीर्तिराज चव्हाण यांनी केले.
यावेळी शिक्षक, शिक्षकोत्तर,कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे विजय, आकाश तांदळे, आदर्श सावळे अंशुल बावनगडे शिवा बावनगडे, महक थावराणी,अभिषेक पवार, यश तिडके,हर्ष महाजन, दिया चौधरी, राधा शेगोकार,सौरभ बावस्कर, संकेत धनकुटे, दिव्या कचाले,तनुश्री,ऋषी तायडे, आदित्य पुरी, यश बावस्कर यांनी अथक परिसर घेतले. संपूर्ण सोहळा उत्सव व भक्तिमय वातावरण संपन्न झाला.
.
0 Comments