चिऊताई सह पक्षांसाठी शंभर जलपात्र लावण्याचा हरिओम जगदंबा उत्सव मंडळाचा संकल्प
खामगाव प्रतिनिधी उन्हाळ्याच्या दिवसात चिऊताईसह अन्य पक्षांवर तहान भागविण्यासाठी व व भूक भागविण्यासाठी भटकंतीची वेळ येऊ नये यासाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील बसेश्वर चौकातील श्री हरी ओम जगदंबा उत्सव मंडळ तर्फे पक्षांसाठी दाणा व पाण्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे 27 फेब्रुवारी 26 रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या दिवशी 11 ठिकाणी जल व दाणापात्र बांधण्यात आले आणि त्यामध्ये पाणी व दाणे टाकण्यात आले आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पक्षांचे वास्तव्य अधिक आहे अशा अशा ठिकाणचा शोध घेऊन हे जलपात्र व दाणेपात्र बांधण्यात आले आहे जलपात्र हे माती पासून तयार करण्यात आले आहे त्यामुळे यातील पाणी थंड होण्यास मदत मिळणार आहे दाणे ठेवण्यासाठी लागणारे पात्र हे पण कुंभाराकडून बनवून घेण्यात आले आहे यामुळे ज्या भागात हे जलपात्र व दाणेपात्र लावण्यात आले आहे त्यामुळे त्या भागातील पक्षांची पाणी व भूक भागविण्यासाठी भटकंती खऱ्या अर्थाने थांबण्याचा मदत मिळणार आहे लावण्यात आलेल्या या पात्रांमध्ये दररोज नित्यनेमाने सायंकाळच्या सुमारास रवी भोसले व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी जाऊन त्यात नवीन पाणी व दाणे टाकणार आहे त्यामुळे पक्षांना पोटाची भूक शवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धान्याच्या रूपाने अन्न खाण्यास मिळणार आहे विशेष म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे जलपात्र लावण्याआधी कोणत्या ठिकाणी पक्षांची किलबिलाट अधिक दिसून येते त्या जागेची पाहणी केली आणि त्या ठिकाणी हे जलपात्र झाडावर बांधले आहे
शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पक्षांचा अधिक वावर दिसतो अशा 100 जागांवर या मंडळातर्फे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे पात्र बांधण्याचा व त्यात नित्यनेमाने पाणी व दाणे टाकण्याचा संकल्प मंडळाचे अध्यक्ष रवी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे या मंडळाचे कार्यकर्ते सायंकाळच्या सुमारास ज्या भागाचे पात्र लावण्यात आले आहेत त्या भागात दररोज जाऊन त्यातील पाणी काढून टाकून त्यात नवीन पाणी व दाणे टाकणार आहेत रवी भोसले यांच्या संकल्पनेतून पक्षांसाठी वरदान ठरणारा हा उपक्रम यंदा प्रथमच हाती घेण्यात आला आहे उन्हाळ्याच्या दिवसात वाटसरूंची तहान भागविण्यासाठी शहरातील संघटना संस्था व दानशूर लोक पाणपोई सुरू करतात पण पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पात्र लावण्यासाठी बोटावर मोजण्या इतके मंडळे व संस्था पुढे येताना दिसतात
हे जलपात्र योगेश वानखडे डॉक्टर मनोज गनवाणी मयूर देवगिरीकर आकाश चिखलकर सार्थक लामधाडे योगेश गांधी कृतिक चिखलकर श्रीकांत भोसले अथर्व गोरले सुरज मुळतकर गणेश महाले राम जोशी तुषार सुलताने मनोज गवात्रे रुपेश गांधी यांनी बांधले आहेत
0 Comments