*महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिव्यांगाची फरफड*
'*नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड ' मधून सूट द्यावी - मनोज नगरनाईक*
खामगांव (संतोष आटोळे) दिव्यांगाचा कोणी वाली नसताना सरकारने पुन्हा नवीन नियम लागू करून दिव्यांगाचे हाल सुरु केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री यांनी आदेश देत सर्व राज्यात एसटी प्रवासात सवलत मिळण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड ' काढावे अन्यथा एस टी मधून प्रवास करताना पूर्ण भाडे आकारले जाईल. यामध्ये महिला जेष्ठ नागरिक, महिला, विध्यार्थी दिव्यांग यांचा समावेश करण्यात आला. दिव्यांग आधीच अडचणीचा सामना करीत असून आता सरकारने काढलेल्या नवीन नियमामुळे हाल होत आहे. आर्थिक संकटात असेलला दिव्यांगाना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड ' मधून सूट द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री यांच्याकडे निवेदनद्वारे जिल्हा विभाग नियंत्रक यांच्यामार्फत खामगाव वाहतूक नियंत्रक तिजारे मॅडम यांना मनोज नगरनाईक विनोद भोकरे (जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल ) प्रहार शहराध्यक्ष क्षत्रुघन इंगळे यांच्यासह दिव्यांग बांधवानी निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करत असताना आता सर्वांसाठी सवलत घ्यायची असेल तर महिला, जेष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टहीन, दिव्यांग, विद्यार्थी, इतर सवलती असलेले घेत असलेले नागरिक, व सवलत नसलेले प्रवासी यांच्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड असे एक कार्ड तयार करण्याची योजना आणली आहे.
या योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग बांधवांना ते स्मार्ट कार्ड तयार करून घेऊन त्याद्वारे पेमेंट करावे लागणार आहे.
याआधीही एसटी महामंडळाने असा प्रयोग केला होता. फिनो कंपनीचे स्मार्ट कार्ड 55 रुपये भरून नोंदणी करून घेतली होती त्यावेळी संघटनांनी त्वरित त्याला हरकत घेऊन ते कार्ड रद्द करून युडिआयडी कार्ड वर सवलत ग्राह्य धरणे बाबत अपंग कल्याण आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार युडीआयडी कार्ड वर सवलत दिली जात होती.
परंतु आत्ता पुन्हा एसटी महामंडळाने असे नवीन नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड काढून "अपंग व्यक्ती अधिनियम 2016" चे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे.कारण दिव्यांग व्यक्तींना सवलत घेण्यासाठी सर्वत्र देशभर युडीआयडी कार्ड ग्राह्य धरावे असे कायद्यात तरतूद आहे परंतु याच udid कार्ड च्या माध्यमातून एसटी महामंडळ असे नवीन स्मार्ट कार्ड काढून अपंगांच्या खिशात अजून एक कार्डची भर टाकत आहे.
हे नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड काढण्यासाठी 199 रुपये एसटी महामंडळाकडे भरावे लागणार आहेत आणि त्यामध्ये शंभर रुपये डिपॉझिट ठेवून 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागणार आहे.
सध्या दिव्यांग नागरिकांची प्रवास करण्याची क्षमता लक्षात घेता काही लोक कधीतरी वर्षातून एकदा प्रवास करत आहेत तर काही लोक महिन्यातून दोन महिन्यातून प्रवास करत आहेत अशा नागरिकांना हे नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड काढून काही उपयोग होणार नाही जर शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी युडीआयडी कार्ड काढले आहे तर याच कार्डवर सवलत देण्यात यावी भलेही त्याचे व्हेरिफिकेशन वाहकाने करावे त्याला कोणत्याही दिव्यांग हरकत घेणार नाही परंतु असे कार्ड काढून दिव्यांग व्यक्तीच्या खिशातून शासन रक्कम काढत असल्याचे दिसून येत आहे. आधीच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर मिळत नाही आर्थिक चनचन भासत आहे त्यात आता महामंडळाकडे पैसे भरायचे आहे हाही दिव्यांग व्यक्तीनां भुर्दंड असणार आहे
तसेच आपण नवीन सुरू केलेल्या शिवाई व इतर नवीन बस मध्ये इतराना सवलत आहे परंतु दिव्यांग घटकाला नाही ती सुद्धा देण्यात यावी
तरी आपण आमच्या भावनांचा विचार करून दिव्यांग व्यक्तीनां या योजनेतून वगळावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनोज नगरनाईक संपादक दिव्यांग शक्ती अध्यक्ष विराट मल्टिपर्पज फाउंडेशन खामगाव, विनोद कृष्णाजी भोकरे संपादक तथा जिल्हाध्यक्ष (बिरसा क्रांती दल ), प्रहार शहराध्यक्ष क्षत्रुघन इंगळे, शेखर तायडे, श्रीहरी वानखेडे,मनोज गणवानी,सुनील देशपांडे,,राजू देशमुख, ऋषिकेश अंधारे, जिल्हाध्यक्ष कविताताई इंगळे, पल्लवीताई पाटील, जसवंत बुधवाणी, सय्यद तसलीम सय्यद अली, मनोज पालीवाल, कैलास शिंदे, सुरेंद्र चव्हाण, ओम प्रकाश छंगानी, एन पी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments