Advertisement

युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात होळी हा सण साजरा करण्यात आला*खामगांव/(संतोष आटोळे)

*युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात होळी  हा सण साजरा करण्यात आला*
खामगांव/(संतोष आटोळे)
           शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध अवचार यांनी मुलांना होळी कशी  कधीपासून साजरी  करतात याविषयी सविस्तर माहिती  दिली. श्री गोपाल अग्रवाल सर यांनी मुलांना व शिक्षकांना होळी या सणाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. पारंपारिक पद्धतीने पूजाअर्चा नैवेद्य ,तसेच पळसांची फुले ,एरंडेल ची फांदी याचे महत्त्व संगीता मॅडम यांनी सांगितले .सर्व मुलांनी शिक्षकांनी एकमेकांना रंग लावून सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.  नंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी हिमांशू   राठोड हिरण्यकश्यप व होलिका यांच्या विषयी सांगितले तसेच इयत्ता दुसरीची विद्यार्थी भाविका  बोदडे भक्त प्रल्हाद यांच्या जीवनावर छान अशी गोष्ट सांगितली इयत्ता  तिसरीचा विद्यार्थी रेयांश  पाटील आणि श्रावणी यांनी भक्त प्रल्हाद यांच्या जीवनावर छान छान अशा गोष्टी सांगितल्या. पुनीत गांधी व आदर्श काचकुरे या दोघांनी कुठले गुण होळीमध्ये टाकावे हे सांगितले तसेच प्री प्रायमरी च्या मुलांनी काम, क्रोध ,मोह,मत्सर हे आळीपाळीने होळीमध्ये टाकले नंतर शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल सर, शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी होळीची पूजा केली आणि होलिका दहन केले. तसेच सर्व शिक्षकांनी  सुद्धा होळीची पूजा केली. व मोठ्या आनंदाने होळी हा सण साजरा केला. 


तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकमेकांना रंग लावून होळी हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला. सर्वांनी होळीला प्रदक्षिणा मारून धुलीवंदन साजरे केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आनंदीत दिसत होते.

Post a Comment

0 Comments