*होळीनिमित्त ग्राम स्वच्छता व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम संपन्न**
खामगांव /(संतोष आटोळे) गेल्या अनेक वर्षापासून श्रीगुरुदेव सेवा मंडळ,माटरगाव च्या वतीने होळी सणाच्या निमित्ताने पर्यावरण जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो.
त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा आपला पारंपारिक निसर्गपूरक असलेला होळीचा सण साधुसंतांनी सांगितलेल्या विचाराने संपन्न व्हावा. म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या प्रेरणेने गेल्या अनेक वर्षापासून श्री गुरुदेव सेवा मंडळ नैसर्गिक रंग कार्यशाळा, पाण्याचा सुयोग्य वापर, परिसर स्वच्छता याविषयीची जनजागृती पथनाट्य, पर्यावरण जनजागृती रॅली, प्रबोधन इत्यादी उपक्रम सातत्याने राबवत असते. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 2 मार्च रोजी जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव येथे प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रामभाऊ दळवी, राम देशमुख, व श्रीपाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे भारतीय संस्कृती, सण उत्सव, निसर्गाची जपणूक, आरोग्याची काळजी, पाण्याचे महत्व याबाबत आपल्या मार्गदर्शनातून प्रबोधन केले.त्याच बरोबर माटरगाव खुर्द पुलाजवळ होळीनिमित्त श्रमदान करून त्या परिसराची स्वच्छता केली.
जिल्हा परिषद हायस्कूल येथील प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महालक्ष्मी कृषी विद्यालयाचे अध्यक्ष अनंत आळशी, प्रमुख पाहुणे रामभाऊ दळवी, जिल्हा परिषद हायस्कूलचे विजय मगर, धनराज कन्नर, श्रीपाद कुलकर्णी, विलासराव देशमुख गजानन निखाडे लक्ष्मण फुटवाईक व सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय देशमुख गणेश बोदडे विपुल वैद्य एडवोकेट पवन देशमुख राजेश काळे प्राध्यापक अतुल जाधव गोविंद देशमुख,समर्थ देशमुख संकेत मुरे पार्थ देशमुख, प्रेम धोटे मंथन डांगे मंदार देशमुख कुणाल धोटे समर्थ घाटे, आशिष धोटे व कराळे काका आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments