Advertisement

१७ मे २०२६ | रोजी शिवसेना खामगाव विधानसभेचा प्रथमच भव्य असा BLA बुथप्रमुख यांचा मेळावा संपन्न झाला*खामगांव /(संतोष आटोळे)

*१७ मे २०२६ | रोजी शिवसेना  खामगाव विधानसभेचा प्रथमच भव्य असा BLA बुथप्रमुख यांचा मेळावा संपन्न झाला*
खामगांव /(संतोष आटोळे)
       खामगांव शहरातील देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे
खामगांव विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व BLA-2 बुथप्रमुख यांचे प्रशिक्षण व शिबीर संपन्न झाले.
विशेष म्हणजे दुपारची 1:30 वेळ असताना सुद्धा भर उन्हात 44.45 डिग्री तापमान असताना अत्यंत उत्साहात बीएले बुथ प्रमुख मोठ्या प्रमाणात उपस्थिती सर्वांना प्रभावित करत होती. महिलांचा युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता खामगाव विधानसभा मध्ये प्रथमच बुथ प्रमुख BLA यांचा भव्य असा प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला.शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी उपस्थित राहून संवाद साधला व मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण शिबीरास शिवसेना पश्चिम विदर्भ सचिव श्री.वैभवजी थोरात,बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख श्री.संजयजी सोनार,
शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वक श्री.संजयजी अगलदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवसेना नेते अँड अमोल अंधारे यांची BLA-1 पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट असे नियोजन करत BLA-2 बुथ प्रमुख मेळावा संपन्न केला. त्यांना शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या शिवसेना BLA नेमणूक अभियान संदर्भात खामगांव विधानसभा  मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत बूथ निहाय शिवसेना BLA नेमणुकीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रत्येक बूथवर BLA नेमणुका लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.यामुळे आज जनतेकडून आपल्याला पाठिंबा मिळत आहे.आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब हे जनसामान्यांचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी शिवसैनिकाची ओळख आहे.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन,तसेच स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती कशी राबवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत BLA नेमणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि पुढील कार्याची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना संहसंपर्क प्रमुख श्री.शांताराम दाणे,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संतोषराव डिवरे,युवासेना जिल्हाप्रमुख श्री. ऋषीभाऊ जाधव,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शारदाताई पाटील,खामगांव शिवसेनेचे नेते श्री.अमोल अंधारे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.संजय अवताडे,शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री.राजेंद्र बघे,शेगाव तालुकाप्रमुख श्री.रामा थारकर खामगाव,विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments