Advertisement

मेहकर येथे आदर्श गुरूबंधू महाराष्ट्र भूषण देविदास शर्मा यांचा सत्कार संपन्न*खामगांव /(संतोष आटोळे)

*मेहकर येथे आदर्श गुरूबंधू महाराष्ट्र भूषण देविदास शर्मा यांचा सत्कार संपन्न*
खामगांव /(संतोष आटोळे)
       म्हणतात नं एखाद्या व्यक्ती चे किती ही कौतुक करा ते कमीच असते तसेच खामगाव येथील सतिफैल परीसरात राहणारे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व आदर्श गुरूबंधू देविदास उर्फ मुन्ना शर्मा यांचे सुद्धा जितके कौतुक करा तितके कमी च आहे. एकदम साधे रहाणीमान लहानपणा पासुन धार्मिक. आध्यात्मिक. व सामाजिक कार्याची गोडी त्यांनी सन 2000 मध्ये मंडळाची स्थापना केली व मागील २६ वर्षा पासून निस्वार्थ प्रामाणिक पणे मंडळाची धुरा सांभाळत आहे व सतत कार्य करत आहे त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. भारत गौरव पुरस्कार. महाराष्ट्र बहुजन रत्न पुरस्कार. विश्वकर्मा रत्न पुरस्कार. नॅशनल आयकॉन अवार्ड. इंडियन एक्सलेन्स अवार्ड असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असुन अनेक सामाजिक. धार्मिक संघटना तर्फे त्यांचा संम्मान झाला आहे ता १२ मे रोजी मेहकर येथे वेदिका लॉन मध्ये अनेक राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थित गुरूबंधू देविदास शर्मा यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच दिलीप झापर्डे, विनोद सुकाळे यांचा ही सत्कार करण्यात आला.

   या शुभ सत्कार प्रसंगी से. नि. शिक्षक साहेबराव तुपकर, से. नि मं अधिकारी रुपराव तुपकर, मा. ग्रा सदस्य हिम्मतराव तुपकर, अध्यक्ष स. ए. म बहुउद्देशिय संस्था गुलाबराव तुपकर, से. नि. मेझर पाटबंधारे विभाग अशोक तुपकर,शिक्षक दिपक तुपकर,शिक्षक नितीन तुपकर,ग्रंथपाल लक्ष्मण तुपकर, ग्रा प सदस्य जगदीश तुपकर, भुषण तुपकर, मॅनेजर एस बी आय चेतन तुपकर, मा उपसरपंच प्रदीप तुपकर, गजानन तुपकर, विजय तुपकर जलसपदा विभाग, समाधान तुपकर, गणेश तुपकर, जानकीराम तुपकर, गजानन तुपकर, भागवत तुपकर, भास्कर तुपकर,जर्नाधन तुपकर,आसाराम तुपकर,विष्णु तुपकर,विजय तुपकर व महीला, पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments