*सुसंस्कार शिबिरे ही काळाची गरज*
*रामगोपाल तायडे*
आजचे बालक हे उद्याच्या देशाचे आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्या बालकांवर बालपणीच सुसंस्कार झाले पाहिजे.सुसंस्कार घडविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन प्रत्येक गावात होणे गरजेचे आहे. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींनी सुरू केलेले हे वर्ग केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात आयोजित करण्यात येत आहे.हेच या वर्गाच्या यशाचे गमक ठरले असल्याचे प्रतिपादन रामगोपाल तायडे यांनी केले.
तालुक्यातील जळकाभडंग येथील महादेवसंस्थान मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 23 मे ते 3 जून 26 या कालावधीत श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या शिबिराचे उद्घाटन 23 मे रोजी रामगोपाल तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. अध्यक्षस्थान जळकाभडंग येथील सूरदास महाराज यांनी भूषविले होते. विलास करणकार, श्रीकांत गावंडे, संविद करणकार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
पुढे बोलतांना तायडे म्हणाले की,आज बालकांमध्ये वाढती व्यसाधिनता, मोबाईलचे अतिरेकी आकर्षण, कुटुंबातील वडीलधारी मंडळी विषयी असलेली आदरभावना दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.ही बाब चिंतनीय असून या सर्व गोष्टींपासून आपल्या बालकाला जर दूर ठेवायचे असेल तर सर्वांगीण बालसंस्कार शिबिरच हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुरजदास महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सुसंस्कार शिबिराचे महत्त्व विशद करून जळकाभडंग येथील शिबिराच्या माध्यमातून अनेक शिबिरार्थी हे सुसंस्कारित होऊन बाहेर पडले आहे.काही जण कीर्तनकार, मृदुंगवादक, पावल्या करण्यात तरबेज झाल्याचे सांगितले.
या शिबिरात खामगाव,नांदुरा, मलकापूर यासह अन्य तालुक्यातील 92 बालक शिबिरार्थी सहभागी झाले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विलास करणकार यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत गावंडे यांनी केले. या शिबिरात योगासनाचे धडे योगशिक्षक देशमुख, भजनाचे प्रशिक्षण भागवत ढोरे, बौद्धिकाचे धडे क्षितिज अनोकार, सामुदायिक प्रार्थना व सामुदायिक ध्यानाचे धडे तायडे, लेझीमचे प्रशिक्षण लखन पिवळतकर, लाठीकाठीचे प्रशिक्षण दीपक चीम, पावल्यांचे प्रशिक्षण मंगेश झाडोकार, मलखांब चे प्रशिक्षण गोलाईत, कराट्याचे प्रशिक्षण प्रवीण वाडेकर,रोप मल्लखामाचे प्रशिक्षण गुंजन पडघान,कराट्याचे प्रशिक्षण प्रणव वाडेकर हे देत आहे.
0 Comments