Advertisement

खेर्डा बु. येथील अखंड हरिनाम सप्ताहची भक्तिमय वातावरणात सांगता..महाप्रसाद व भव्य दिंडी सोहळ्याने भाविक तृप्त, हजारो भाविकांची उपस्थिती.. सौ गीता सोनोने

खेर्डा बु. येथील अखंड हरिनाम सप्ताहची भक्तिमय वातावरणात सांगता..
महाप्रसाद व भव्य दिंडी सोहळ्याने भाविक तृप्त, हजारो भाविकांची उपस्थिती.. सौ गीता सोनोने

जळगाव जामोद 
     तालुक्यातील खेर्डा बु. येथील श्री लक्ष्मीनारायण भगवान मंदिर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीतमय श्रीमद भागवत कथेची सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात महाप्रसाद व भव्य दिंडी सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ह.भ.प. भागवताचार्य दिव्याताई मापारी खैरा आळंदीकर यांच्या सुमधुर व सुश्राव्य वाणीतून संगीतमय भागवत कथेचे निरुपन झाले. दि.१८ मे पासून सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा, ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ व  दुपारी ३ ते ५ श्रीमद भागवत कथा, सायंकाळी ५ ते  ६ हरिपाठ व रात्री ८ ते  १० हरिकीर्तन असे  दैनिक विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.सोमवार सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन ह भ प दिव्याताई मापारी त्यांच्या दिव्य वाणीतून संपन्न  झाले. कीर्तनाला गावातील तील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी भव्य अशी दिंडी सोहळा काढण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर गाथा पारायणाने सप्ताहाची सांगता झाली.
या सप्ताह यशस्वी करण्यासाठी निवाणा, रुधाना, वकाना, सुनगाव, सावरगाव, खेर्डा बु. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील टाळकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. गावातील महिला, पुरुष, युवक व बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा दिली. आठ दिवस चाललेल्या या सोहळ्यामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
श्री लक्ष्मीनारायण भगवान यांच्या कृपेने व सर्व संतांच्या आशीर्वादाने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला, अशी भावना आयोजकानी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी महिला सेवाधारी गट ,करण्यासाठी हरिदास गिऱ्हे, मारुती वानखडे ,दीपक येनकर,आत्माराम वानखडे, गजानन वेरुळकर,भास्कर उमरकर, जयदेव वानखडे, परमेश्वर उगले,अनंता वानखडे, सुमंत वानखडे, बाळू देऊळकर, पूर्णाजी तायडे, राजू तायडे,दिलीप भोपळे उमेश गिऱ्हे, यांच्यासह महात्मा फुले मंडळ व गावकरी मंडळी त्यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments