अकोला ग्राम पंचायत आगर ता जिल्हा अकोला येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचारची चौकशी दिनांक 15.5.2026 रोजी मा गटविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत सदर चौकशी समिती मध्ये उल्हास मोकळकर विस्तार अधिकारी पंचायत समिती अकोला जानूनकर कनिष्ठ अभियंता पंचायत समिती अकोला संदिप घोरमोडे सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती अकोला उमेश निखाडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती अकोला यांची चौकशी समिती नेमली आहे सदर चौकशी खालील मुद्द्यांवरच्या चौकशी समिती करणार आहे शासनाकडून सर्व प्रकारचाआलेला निधी आणि खर्च केलेला आणि शिल्लक किती.ग्राम पंचायतने गावातील किती करवसुली केली आणि खर्च कोण कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला.दलीत वस्तीसाठी किती निधी आला आणि किती खर्च करण्यात आला शिल्लक किती आहे ग्रामपंचायत ने पंचवीस सव्वीस मध्ये किती ग्राम सभा मासीक सभा वर्ड सभा महीला सभा घेण्यात आल्या त्यांची चौकशी.रोख पूस्तक क्यासबूक तपासणी.ग्राम पंचायत ने आकस्मिक
केलेल्या खर्चा ची तपासणी आगर परीसरातील किती शेत रस्ते मंजूर आहेत आणि किती शेत रस्ते करण्यात आले याची तपासणी ग्राम पंचायतचा लेखा जोखा तपासणी ग्राम पंचायत आगर ता जिल्हा अकोला येथील सर्व मुद्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी त्यामुळे होणारा ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराला आळा बसेल असे एम के दिवनाले जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती अकोला यांनी कळविले आहे
0 Comments