Advertisement

निराधार योजनेचे दोन महिन्यांपासून अनुदान रखडले; लाभार्थ्यांचे तहसीलदारांना निवेदन.. सौ गीता सोनोने

निराधार योजनेचे दोन महिन्यांपासून अनुदान रखडले; लाभार्थ्यांचे तहसीलदारांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क.. सौ गीता सोनोने
जळगाव जामोद :
 संजय गांधी निराधार योजना, विधवा, अपंग तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष जयप्रकाश तायडे आणि लाभार्थ्यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना निवेदन देऊन तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
      निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित लाभार्थ्यांनी स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विधवा, अपंग, श्रावण बाळ तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे.

लाभार्थ्यांनी शासन व प्रशासनाने सात दिवसांच्या आत या समस्येची दखल घेऊन थकीत अनुदान तत्काळ जमा करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.
या निवेदनावर मिठाराम तायडे, रामभाऊ सातव, शाहदेव वानखेडे, जयदेव पांडुरंग वानखेडे, पार्वताबाई घाटे, भागदेव घाटे, सारंगधर घाटे, धुपताबाई वानखेडे, गोकरणीबाई म्हसाळ व श्रीकृष्ण म्हसाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो... नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करताना जयप्रकाश तायडे

Post a Comment

0 Comments