*हजारो रुग्णांचे आधारवड सूरज यादव यांची 'प्रदेश उपाध्यक्ष' पदि नियुक्ती*
*खामगाव(संतोषआटोळे ) येथील एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष समाजसेवेच्या क्षेत्रात निस्वार्थ भावनेने झटणारे व महाराष्ट्रातील सुपरिचित रूग्णसेवक, गौसेवक श्री. सूरज शिवमुरत यादव यांची 'महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना' च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी *दि.30/05/2026* रोजी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रविण समाधान भोटकर यांनी श्री. यादव यांच्या रुग्णसेवेची व निष्ठेची दखल घेत ही महत्त्वपूर्ण व सन्मानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. *चौदा वर्षांचा अनुभव:* श्री. सूरज यादव यांनी यापूर्वी आदि सहा वर्ष बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेची जबाबदारी अत्यंत निष्ठेने व यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात संघटनेचा मोठा विस्तार झाला असून, शेकडो नवीन कार्यकर्ते संघटनेत जोडले गेले. मूळ खामगाव, जि. बुलढाणा येथील श्री. सूरज यादव यांनी आजपर्यंत हजारो गोरगरीब, गरजू, दिव्यांग, थॅलेसिमिया, किडनी आजार, कॅन्सरग्रस्त, हृदयविकार व गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोफत औषधी आर्थिक मदत तसेच रक्त उपलब्ध करून दिले आहे. तसेच, असंख्य गरजूंना शासकीय योजनांचा लाभ, मुख्यमंत्री सहायता निधी, अपंग प्रमाणपत्र, मोफत उपचार व रुग्णवाहिका सेवा मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः रात्रंदिवस धावपळ केली आहे. 'सेवा परमो धर्मः' या ब्रीदवाक्यानुसार ते अहोरात्र रुग्णसेवेत व गौसेवेत झटत असून, त्यांना 'रुग्णांचे आधारवड' व 'संकटकाळातील देवदूत' म्हणून ओळखले जाते. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना श्री. यादव म्हणाले, "मा. प्रविण भोटकर साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अनमोल आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम करताना मिळालेला अनुभव आता प्रदेश पातळीवर उपयोगात आणणार आहे. संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक गोरगरीब, वंचित, दिव्यांग व दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हे माझे ध्येय असेल. ही निवड माझी नसून, खामगाव व बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णसेवकाची व माझ्या सहकाऱ्यांची आहे." श्री. सूरज यादव यांच्या या निवडीबद्दल खामगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्हा, विदर्भ व राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक सामाजिक संस्था, रुग्णसेवक, दिव्यांग बांधव व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.अशी माहिती रुग्णसेवक आशिष सावळे अकोला यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
0 Comments