*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन समाज उत्कर्षासाठी प्रेरणादायी कार्य केले*
......*माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन*
खामगाव/(संतोष आटोळे ) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन समाज उत्कर्षासाठी अनेक लोकाभिमुख कार्य केले. त्यांनी आपल्या राज्यकारभारात न्याय, धर्म, विकास आणि जनकल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. देशभरातील अनेक मंदिरे, घाट आणि धर्मशाळांचे त्यांनी पुनर्निर्माण करून भारतीय संस्कृतीचे जतन केले. स्त्रीशक्ती, कर्तव्यदक्षता आणि लोकसेवेचे त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजसेवा आणि जनकल्याणासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी अभिवादन ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. रविवार दि. 31 मे 2026 रोजी जनसंपर्क कार्यालय गांधी चौक येथे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस खामगाव शहराध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा सौ.शारदाताई शर्मा, खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, शहर कार्याध्यक्ष केशव कापले, प्रफुल कुलकर्णी, दिनेश गावंडे, प्रताप कदम, मदन गावंडे, निलेश तासतोडे , संतोष आटोळे,अवधुत टिकार आदी उपस्थित आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श राज्यकर्त्या नव्हत्या, तर त्या जनतेच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवणाऱ्या लोकमाता होत्या. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 648 कोटी रुपयांचा निधी दिला होता.आज त्यांच्या जयंतीदिनी अनेक मान्यवरांच्या हस्ते या स्मृतीस्थळाचे भुमिपुजन होत आहे,सर्वांना सोबत घेवुन चालणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श, त्यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये केलेले प्रयत्न सर्वांनी आत्मसात करावे असे सांगुन सानंदांनी उपस्थितांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे, शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,संतोष आटोळे यांनी सुध्दा आपल्या भाषणातुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख कार्याची माहिती विषद केली.
सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,तद्नंतर उपस्थितांनी सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते उपस्थितांना पेढे वाटप करुन येळकोट-येळकोट जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments