Advertisement

*१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा*खामगांव (संतोष आटोळे )

*१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा*
खामगांव (संतोष आटोळे )
          २१ जून रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संतनगरी शेगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारस यांच्या वतीने वारकरी नगर, शेगाव येथे संत गजानन योगा क्लासेस आयोजित करण्यात आले होते. सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत आयोजित कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी योग शिक्षिकांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा व योग शिक्षिका सौ. चंदाताई सुरेश ददगाळ यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थित महिलांनीही उत्साहाने योगाभ्यासात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होऊन निरोगी जीवनाचा संदेश देण्यात आला.

Post a Comment

0 Comments