Advertisement

श्री संत गजानन महाराज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, एकलारा बानोदा यांचा 100% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान.

श्री संत गजानन महाराज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, एकलारा बानोदा यांचा 100% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान
संग्रामपूर तालुक्यातील नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालामध्ये श्री संत गजानन महाराज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, एकलारा बनोदा, ता. संग्रामपूर येथील 
 यंदाही 100% निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
संस्थेतील बांधकाम पर्यवेक्षक (Construction Supervisor) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले.त्यामध्ये वेदांत गजानन टाकळकार यांनी  86.86% गुण मिळवून प्रथम क्रमांक,निखिल नाजुकराव माहुळकर  86% गुणांसह द्वितीय क्रमांक, शेख जुनेद शेख रौफ  85.86% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी संस्थेतील अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद तसेच प्राचार्य शिवकुमार भातखडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाला दिले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सुरेशराव राजारामजी भातखडे साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातही मेहनत, शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर अधिक यश संपादन करावे, असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेच्या या यशाबद्दल पालक, माजी विद्यार्थी व परिसरातील नागरिकांकडून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शिक्षण क्षेत्रात संस्थेने निर्माण केलेला गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments